शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Video: छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांतीचौकात राडा; मविआ - भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 12:40 IST

दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी समोरसमोर येत जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

छत्रपती संभाजीनगर : शहारातील क्रांती चौकात महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक होऊन जोरदार घोषणाबाजी करत आहेत. पोलिसांची एक फळी दोन्हीकडील कार्यकर्त्यांना शांत करत आहे. दोन्ही बाजूंच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. 

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक घोसळकर यांच्या हत्येवरून राज्यातील कायदा-सुवस्थेवर निदर्शने करण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आज सकाळी ११ वाजता क्रांती चौकात जमले होते. याचवेळी भाजपचे कार्यकर्ते राहुल गांधी यांचा प्रधानमंत्री मोदी यांच्यावर केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी जमा झाले. मविआच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. दोन्ही कार्यकर्ते अचानक समोरसमोर आले. वेळीच पोलिसांनी धाव घेत दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, दोन्ही बाजूची कार्यकर्ते माघार घेत नसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी मविआच्या कार्यकर्त्यांनी फक्त त्यांचेच कार्यकर्ते ताब्यात घेतल्याचा आरोप केला. काहीवेळाने तणाव निवळला.

राज्यात गुंडांची सुव्यवस्था - मविआ

राज्यात सर्वसामान्यांसाठी कायद्याचे राज्य राहिले नाही. मुख्यमंत्री यांचा बंगला गुंडांचा अड्डा झाला आहे. गृहमंत्री फडणवीस हे अकार्यक्षम आहेत. त्यांच्यामुळे गुंडांना सुव्यवस्था मिळत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी करत जोरदार घोषणाबाजी केली.

भाजपकडून राहुल गांधींचा निषेध 

कॉँग्रेस नेते राहुल गांधी कायम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलतात, त्यांचा अवमान करतात याचा निषेध करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते क्रांती चौकात जमले होते. भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.

टॅग्स :BJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीAurangabadऔरंगाबाद