क्रीडा स्पर्धेत बक्षिसांचा ‘पाऊस’!
By Admin | Updated: August 29, 2016 01:00 IST2016-08-29T00:14:22+5:302016-08-29T01:00:52+5:30
बीड : पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारपासून सुरु झालेल्या या स्पर्धांचे बक्षीस वितरण रविवारी मोठ्या थाटात पार पडले.

क्रीडा स्पर्धेत बक्षिसांचा ‘पाऊस’!
बीड : पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारपासून सुरु झालेल्या या स्पर्धांचे बक्षीस वितरण रविवारी मोठ्या थाटात पार पडले. बक्षीस वितरणप्रसंगी पावसाने केलेले जोरदार पुनरागमन व जिल्हाधिकारी नवलकिशोर यांनी विजेत्या खेळाडूंच्या पाठीवर टाकलेली कौतुकाची थाप यामुळे कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला.
पोलीस मुख्यालयावर धावणे, फूटबॉल, बॉस्केटबॉल, क्रिकेट आदी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. पोलिसांच्या मुला- मुलींसाठी लिंबू- चमचा व कुटुंंबीयांसाठी संगीत खुर्ची या स्पर्धाही घेतल्या. मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. शिस्तबद्ध पथसंचलनाने सर्वांचे लक्ष वेधले. तत्पूर्वी महिला, पुरुषांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धा पार पडल्या. सहायक अधीक्षक डॉ. हरि बालाजी एन., उपअधीक्षक गणेश गावडे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे तर सूत्रसंचालन अमोल शेळके यांनी केले. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भाषणाला सुरुवात करताच पावसाच्या सरी बरसण्यात सुरुवात झाली. भर पावसात त्यांनी भाषण केले.
४ते म्हणाले, जिल्हा पोलीस दल सक्षमपणे काम करत आहे. क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून पोलीस दलातील खेळाडूंनी मराठवाडा, राज्यस्तरावरील स्पर्धा गाजवाव्यात. पोलिसांना क्रीडा स्पर्धेत अनेक चांगल्या संधी आहेत. त्यामुळे या संधीचा आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
४स्पर्धेच्या समारोपाला पावसाने लावलेल्या हजेरीचा धागा पकडून जिल्हाधिकारी म्हणाले, ही चांगली सुरुवात आहे. बीडचे पोलीस आवश्य सन्मान वाढवतील.