रबीची पेरणी केवळ ४८ टक्के
By Admin | Updated: November 21, 2014 00:48 IST2014-11-21T00:28:53+5:302014-11-21T00:48:28+5:30
राजेश खराडे , बीड ना जमिनीत कस...ना पेरणीलायक जमिनीत ओल केवळ बेभरवाश्याच्या पावसावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेऊन पेरणीकरिता टिफण उचलली असली तरी सबंध रबी हंगामातील पिकांचे भवितव्य हे अंधारातच दिसत आहे.

रबीची पेरणी केवळ ४८ टक्के
राजेश खराडे , बीड
ना जमिनीत कस...ना पेरणीलायक जमिनीत ओल केवळ बेभरवाश्याच्या पावसावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेऊन पेरणीकरिता टिफण उचलली असली तरी सबंध रबी हंगामातील पिकांचे भवितव्य हे अंधारातच दिसत आहे. केवळ पिकांचा जनावरांसाठी चारा तरी व्हावा या उद्देशानेच रबी पिकांची पेरणी होत असल्याचे चित्र आहे.
ज्वारी उगवून आली खरी मात्र पाऊस नसल्याने या पिकांची वाढ होत नाही बाटुक म्हणून चारा तरी मिळावा हीच सर्वसामान्य शेतकऱ्यांची भावना आहे. ज्वारी हे रबी हंगामातील प्रमुख पिक असून याच्या पेरणीसाठी जमिनीत ओल असने आवश्यक आहे. जमिनीत ओल तर नाहीच परंतु आलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध पाणीसाठा नाही. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर सबंध राज्यातील शेतकरी हा हतबल झाला आहे. जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीकरिता सुमारे ३ लाख ७८ हजार नऊशे हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी अद्यापपर्यंत १ लाख ८१ हजार ५२१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून रबी पेरणी जवळपास संपुष्टात आली असल्याचे दिसत आहे. ज्वारी हे रबीतील प्रमुख पिक असून सर्वाधिक क्षेत्र हे ज्वारीचेच असते. जिल्ह्यातील २ लाख ३४ हजार ३०० हेक्टर क्षेत्रापैकी १ नाख ८१ हजार ५२१ हेक्टरावर पेरणी झालेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ५ टक्के रबीची पेरणी घाली आहे. मात्र यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने गतवर्षीच्या तुलनेत रबीच्या उत्पादनात लक्षणीय घट होणार असल्याचे संकेत येथील कृषी अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. रबी हंगामात ज्वार, गहू,मका, हरभरा, करडई, जवस, सूर्यफुल, तीळ आदी पिकांची लागवड केली जाते.
गतवर्षी १५ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात ५३ टक्के पेरणी झाली होती. त्यावेळी जमिनीत ओल असल्याने रबीची पिके जोमात उगवली तरी होती मात्र यंदा पाऊसच नसल्याने रबी पिकातील पिकांची वाढ खुंटली आहे. आगामी काळात पावसाने अशीच ओढ दिली तर खरीप हंगामाबरोबर रबी हंगामही वाया जाणार असल्याची भिती शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.