: खरीपाबरोबर आता रबी हंगामही धोक्यात
By Admin | Updated: November 19, 2015 00:25 IST2015-11-18T23:47:51+5:302015-11-19T00:25:07+5:30
बीड . केवळ चांगल्या हवामानामुळे व उशिरा झालेल्या पावसामुळे खरीपातील बाजरी आणि तूर या उत्पादनाने शेतकऱ्यांना तारले आहे. बाजरी पाठोपाठ तुरीचे पीक बहरात आहे.

: खरीपाबरोबर आता रबी हंगामही धोक्यात
बीड . केवळ चांगल्या हवामानामुळे व उशिरा झालेल्या पावसामुळे खरीपातील बाजरी आणि तूर या उत्पादनाने शेतकऱ्यांना तारले आहे. बाजरी पाठोपाठ तुरीचे पीक बहरात आहे.
अत्यल्प पावसामुळे संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले होते. सोयाबीन कपाशीची तर महिन्याभरातच पेरणी आणि मोडणीही झाली होती. केवळ बाजरी आणि तुरीला पोषक वातावरण निर्माण झाल्याने ही पीके तरली होती. बाजरीची काढणी पुर्ण झाली असून केवळ याच पिकातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले होते. रबी हंगामाच्या तोंडावर झालेल्या पावसाचा रबी पेक्षा खरीपातील तुरीला अधिक फायदा झाला आहे. सुमारे ३४ हजार ४६६ हेक्टरवर तुरीचा पेरा करण्यात आला होता. योग्य हवामानाबरोबरच अधिकच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी फवारणी केल्याचा फायदा झाला आहे. सध्या तुरीचे पीक अंतिम टप्प्यात असून आता त्याला शेंगआळी, शेंगगळतीचा धोका आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात काही ठिकाणी तुरीच्या काढणीला सुरूवात झाली आहे. अंतिम टप्प्यात पीक असतानाच कीडअळी तसेच शेंगगळती होत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
तुरीकरीता आवश्यक असलेले हवामान लागवाडीपासून महत्त्वाचे ठरले आहे. कोरडवाहू क्षेत्रातील ओल उडाली आहे. तसेच पाण्याअभावी तुरीच्या शेंगगळतीचे प्रमाण वाढले आहे. बागायती क्षेत्रात उत्पादन अधिक होणार आहे.
- रामेश्वर चांडक, कृषी तज्ज्ञ