‘जलयुक्त’मुळे रबीची पिके बहरली

By Admin | Updated: January 5, 2016 00:05 IST2016-01-04T23:28:17+5:302016-01-05T00:05:30+5:30

भोकरदन : जलयुक्त शिवार अभियानातून दुष्काळी परिस्थितीत सुध्दा धावडा व पोखरी गावाच्या परिसरातील ८०० एकर शेतजमिनी मध्ये शेतकऱ्यांची रबीची पिके जोमात आली आहेत.

Rabi crops grew due to 'Jalukta' | ‘जलयुक्त’मुळे रबीची पिके बहरली

‘जलयुक्त’मुळे रबीची पिके बहरली


भोकरदन : जलयुक्त शिवार अभियानातून दुष्काळी परिस्थितीत सुध्दा धावडा व पोखरी गावाच्या परिसरातील ८०० एकर शेतजमिनी मध्ये शेतकऱ्यांची रबीची पिके जोमात आली आहेत.
तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी स्थितीमुळे जमिनीतील पाणी पातळी खोल गेल्याने धावडा भागात शेतकऱ्यांचे खरीप हंगामात मोठे नुकसान झाले. विहिरींना पाणीच नसल्याने रबीची लागवड करणे अवघड बनले होते. मात्र राज्यशासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू करून नदी नाल्यावर सिमेंट बंधारे बांधण्याचा नवीन उपक्रम सुरू केला असुन या मतदार संघात आ. संतोष पाटील दानवे यांच्या प्रर्यत्नामुळे जलयुक्त शिवार योजनेअंर्तगत मोठा निधी उपलब्ध आहे. त्या अंतर्गत धावडा गावाच्या उत्तरेकडील नदीवर पासाळ्यापूर्वी तीन सिमेंट बंधाऱ्याची कामे करण्यात आली होती. या बंधाऱ्यात परतीच्या पावसामध्ये चांगला पाणीसाठा झाला होता. मुस्ताक काझी, संभाजी देशमुख आदी शेतकऱ्यांचा विहिरींचे पाणी वाढले. बंधाऱ्यासाठी ७५ लाख खर्च झाले.
धावडा येथील सरपंच बेलाअप्पा पिसोळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजना चांगली आहे, या योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्यास मदत होणार आहे़
४धावडा येथील माजी उपसरपंच जुमान चाऊस यांनी सांगितले, योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगली आहे. गावाच्या परिसरातील सर्वच नदी व नाल्यावर ही कामे मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे. नाले खोलीकरण सुध्दा करावे अशी मागणी चाऊस यांनी केली़
४संभाजी देशमुख, जुबेर पठाण यांनी सांगितले की, शेतकऱ्याना बंधाऱ्यामुळे चांगला फायदा झाला असून, केवळ या कामांमुळेच आमची रबीची पीके आली आहेत़
४बालाजी घुले यांनी सांगितले की, जर बंधाऱ्याचे काम झाले नसते तर आमच्या या परिसरामध्ये जनावराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असता.

Web Title: Rabi crops grew due to 'Jalukta'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.