रबी पिकाला अवकाळी तडाखा

By Admin | Updated: February 12, 2015 00:55 IST2015-02-12T00:46:51+5:302015-02-12T00:55:00+5:30

जालना : जिल्ह्यास मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. या पावसाने भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, अंबड तालुक्यात ज्वारी, गहू,

Rabi crop rains | रबी पिकाला अवकाळी तडाखा

रबी पिकाला अवकाळी तडाखा


जालना : जिल्ह्यास मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. या पावसाने भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, अंबड तालुक्यात ज्वारी, गहू, फळबागांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी पत्रे उडली तसेच झाडे उन्मळून पडली.
दोन महिन्यांपूर्वीच जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसता होता. त्यात खरीप तसेच रबी पिकांचे नुकसान झाले होते. घरांचीही पडझड झाली होती. आता पुन्हा अवकाळी नुकसान केले. या पावसाने ज्वारी, वेचणी केलेला कापूस, फळबागा, द्राक्ष बागांचे नुकसान झाले.
अंबड तालुक्यात रात्री अकरा वाजता अर्धातास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. सोनकपिंपळगाव, वडीलासुरा, शहागड, बारसवाडा, डोमेगाव, दुनगाव, चिंचखेड, वडीगोद्री, सुखापुरी, दाढेगाव, शेवगा, हस्तपोखरीसह अनेक गावात पाऊस झाला. पाऊस व वादळामुळे काही वेळ वीजपुरवठाही खंडित झाला होता. रबी हंगामातील ज्वारीचे अनेक ठिकाणी खळे सुरु आहेत. काही ज्वारीचे पीक शेतातच आहे.
भोकरदन, फत्तेपूर, जोमाळा, मासनपूर, आलापूर, पेरजापूर, भिवपूर, इब्राहिमपूर नांजा, क्षीरसागर, तांदळवाडी, ताडकळस, बाभूळगाव, विरेगाव, दानापूर, मनापूर, मलकापूर, वाडी आदी गावात वादळी वाऱ्यासह पाऊस तसेच तुरळक प्रमाणात गाराही पडल्या. या पावसात गहू, ज्वारी तसेच सीडस कांद्याचे मोठे नुकसान झाले.
बदनापूर: तालुक्यात मंगळवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे थोड्याफार प्रमाणात आलेल्या पिकांचे नुकसान झाले.
परतूर: मंगळवारी रात्री अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. ज्वारी व काही प्रमाणात गव्हाचे पीक खाली पडले. या वादळी पावसात रात्री काही काळ वीजपुरवठा विस्कळीत झाला. (ग्रामीण भागातील नुकसानीचे वृत्त पान तीनवर))
अवकाळी पावसामुळे गहू तसेच ज्वारीचे मोठे नुकसान झाले. खरीप हंगाम दुष्काळीमुळे तर रबी हंगाम अवकाळी पावसामुळे धोक्यात आला आहे.मंगळवारच्या पावसामुळे गहू व ज्वारीचे नुकसान झाले. वेचणी केलेला शेकडो क्विंटल कापूस पावसामुळे भिजला.
वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील गहू, ज्वारी व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तालुक्यातील अनेक गावांमधील घरांवरील पत्रे या वादळी वाऱ्यामुळे उडाली. अनेक घरांचेही नुकसान झाले. याबाबत बदनापूर येथे ८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दुपारपर्यंत तालुक्यातील पाच मंडळात किती पाऊस झाला याचा अहवाल आला नसल्याची माहिती अव्वल कारकुन दवणे यांनी दिली.

Web Title: Rabi crop rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.