१५ वर्षांपासून क्रीडा संकुलाचा प्रश्न कायम !

By Admin | Updated: March 16, 2015 00:48 IST2015-03-16T00:38:02+5:302015-03-16T00:48:15+5:30

समीर सुतके ,उमरगा आमदार ज्ञानराज चौगुले हे उमरगा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. त्यांचे गावही उमरगा हेच आहे. आमदारकीची त्यांची दुसरी टर्म आहे. मात्र झपाट्याने विस्तारत जाणाऱ्या

The question of sports complex has remained for 15 years! | १५ वर्षांपासून क्रीडा संकुलाचा प्रश्न कायम !

१५ वर्षांपासून क्रीडा संकुलाचा प्रश्न कायम !


समीर सुतके ,उमरगा
आमदार ज्ञानराज चौगुले हे उमरगा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. त्यांचे गावही उमरगा हेच आहे. आमदारकीची त्यांची दुसरी टर्म आहे. मात्र झपाट्याने विस्तारत जाणाऱ्या या शहरामध्ये अद्याप सुसज्ज क्रीडा सकुंल उभे राहू शकलेले नाही. हा प्रश्न मागील १५ वर्षापासून रखडलेला आहे. असे असले तरी हद्दवाढ, अंतर्गत रस्ते, जलशुद्धीकरण आदी प्रकल्प मार्गी लागले आहेत.
आ. ज्ञानराज चौगुले हे उमरगा शहरातीलच असल्याने नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सध्या शहराचा विस्तार प्रचंड गतीने होत आहे. असे असले तरी याठिकाणी आजवर युवकांना आकर्षित करेल असे सुसज्ज क्रीडा संकुल उभा करण्यात यश आले नाही. विशेष म्हणजे हा विषय मागील १५ वर्षापासून प्रलंबित आहे. शहराची लोकसंख्या ५० हजाराच्या घरात असली तरी याठिकाणी सार्वजनिक शौचालयाचा मोठा प्रश्न आहे. विशेषत: कुंभार वस्ती, काळे प्लॉट, कारले प्लॉट, मुन्सी प्लॉट, पिस्के प्लॉट, बालाजी नगरसह झोपडपट्टी भागातील रहिवाशांना गैरसोईला तोंड द्यावे लागत आहे. त्याचप्रमाणे शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचाही प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. याबाबतही मार्ग काढण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे शहरामध्ये अवैध धंद्याचे प्रमाणही वाढले आहे. मटका, गावठी दारु सर्रास विक्री होत आहे. याबाबतही ठोस पावले उचलण्याची गरज नागरिकांतून होत आहे.
दरम्यान, आ. चौगुले यांच्या कार्यकाळात वेगवेगळ्या योजनाही मार्गी लागलेल्या आहेत. १९९८ साली मंजूर असलेली माकणी ते उमरगा ही पाणीपुरवठा योजना अर्धवट अवस्थेत होती. २०१३ च्या दुष्काळी परिस्थितीत ही योजना पूर्ण करण्यात आली. हद्दवाढीचा प्रश्नही मागील २५ वर्षापासून प्रलंबित होता. २०१४ मध्ये तोही मार्गी लागला आहे. शहराला कमी दाबाने वीज पुरवठा होत असे. हा प्रश्न सातत्याने उपस्थित होत होता. त्यावर आ. चौगुले यांनी पुढाकार घेत, १३२ के. व्ही. वीज उपकेंद्र मंजूर करुन घेतल्याने हाही प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.

Web Title: The question of sports complex has remained for 15 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.