जागा पाहणीतच अडकला रुग्णालयाचा प्रश्न
By Admin | Updated: May 26, 2015 00:49 IST2015-05-25T23:59:53+5:302015-05-26T00:49:08+5:30
बीड : मागील दीड-दोन वर्षापूर्वी शहरात २०० खाटांचे स्त्री रुग्णालय मंजूर झाले आहे. दरम्यानच्या काळात शहरातील तीन-चार ठिकाणच्या जागा रुग्णालयासाठी पहाण्यात आल्या

जागा पाहणीतच अडकला रुग्णालयाचा प्रश्न
बीड : मागील दीड-दोन वर्षापूर्वी शहरात २०० खाटांचे स्त्री रुग्णालय मंजूर झाले आहे. दरम्यानच्या काळात शहरातील तीन-चार ठिकाणच्या जागा रुग्णालयासाठी पहाण्यात आल्या. दोन दिवसापूर्वी आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी जिल्हा रूग्णालयाला भेट दिली. दरम्यान बीडच्या स्त्री रुग्णालयच्या जागेचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा होती. मात्र जागा पहाणी च्या पुढे विषय गेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात केवळ नेकनूर येथेच स्त्री रूग्णालय आहे. शिवाय बीड येथे महिला रूग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा स्थितीत बीड येथे प्रस्तावित असलेले २०० खाटांचे स्त्री रूग्णालयाच्या कामाला गती मिळणे अपेक्षीत होते. मात्र दीड-दोन वर्षापासून जागा मिळत नसल्याचे जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. स्त्री रूग्णालयासाठी होत असलेल्या जागा पहाणीचे सर्वसामान्य नागरीकांना काही घेणे-देणे नाही. त्यांना हवी आहे, उत्तम आरोग्य सेवा. (प्रतिनिधी)