दुभाजकाचा प्रश्न ‘मार्गी’!

By Admin | Updated: August 1, 2014 01:05 IST2014-08-01T00:45:43+5:302014-08-01T01:05:49+5:30

सोमनाथ खताळ, बीड शहरातून जाणाऱ्या धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकाची प्रंचड दुरवस्था झाली होती. मात्र, दुभाजकासाठी एक कोटी रुपयांचा निधी आला

The question of dividing 'Margi'! | दुभाजकाचा प्रश्न ‘मार्गी’!

दुभाजकाचा प्रश्न ‘मार्गी’!

सोमनाथ खताळ, बीड
शहरातून जाणाऱ्या धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकाची प्रंचड दुरवस्था झाली होती. मात्र, दुभाजकासाठी एक कोटी रुपयांचा निधी आला असून अवघ्या दीड महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. दुभाजक उभारल्यानंतर यामध्ये झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे शहराच्या सुशोभिकरणात भर पडणार आहे.
येथील जालना रोडवरुन मिनिटाला दहा जड वाहने धावतात. अपूरा रस्ता, वाहनांची वाढती संख्या यामुळे अपघात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बायपास, उड्डाणपूल हे दोन्ही प्रश्न प्रलंबित आहेत. त्यात दुभाजकाचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. दुभाजकाची इतकी दयनीय अवस्थाा झाली होती की, गज रस्त्यावर आले होते. जागोजागी वाहने आदळून नुकसान झाले होते. त्यामुळे दुभाजक दुरुस्तीची मागणी पुढे आली होती. दरम्यान, शिवाजी पुतळ्यापासून बार्शी रोड व जालना रोड या भागात दुभाजकाच्या कामाला जिल्हा नियोजन समितीने मंजूरी दिली आहे. हे काम अवघ्या दीड महिन्यात पूर्ण होणार असल्याने लवकरच शहराचं रूपडं पालटणार आहे.
कामाला सुरूवात
जिल्हा नियोजन व विकास आराखड्यांतर्गत या कामासाठी एक कोटी रंपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सध्या हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांच्या अंतर्गत सुरू आहे. या कामाला बुधवारी रात्री सुरूवात करण्यात आली आहे.
वाहतुकीला लागेल शिस्त
जालना रोडारील एसपी कार्यालय, जिल्हा रूग्णलय व शिवाजी नगर रोड येथे एक व केएसके महाविद्यालयाकडे जाणाऱ्या चौकात वाहनांची ये-जा करण्यासाठी अंतर सोडण्यात येणार आहे. तसेच बार्शी रोड कडील उरलेले दुभाजकाचे अंतर हे जालना रोडच्या मार्गाकडे वाढविण्यात येणार आहे. कारण या मार्गावर जास्त वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होईल.
असे असेल दुभाजक
१३८० मीटर इतक्या लांबीचे दुभाजक आहे. ८० सेमी रूंद व ८५ सेमी उंची असणार आहे. यामध्ये काळी माती टाकून विविध रंगीबेरंगी फुलांची झाडे व शोभेची झाडे लावण्यात येतील. त्यामुळे महामार्ग खुलून दिसणार असल्याचे सा.बां.विभागाचे उपविभागीय अधिकारी एस.सी.दंडे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून बार्शी रोडच्या दिशेने दुभाजकाचे अंतर वाढविण्यात येईल़ पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानापर्यंत दुभाजक साकारण्यात येणार आहे़
दुसरीकडे जालना रोडवरील स्टेडियम रस्त्यापासून शहराबाहेर दुभाजक उभारण्यात येईल़
बायपास रस्त्यापर्यंत दुभाजक उभारण्याचा प्रस्ताव आहे़

Web Title: The question of dividing 'Margi'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.