महिलेच्या पर्समधून पळविले सव्वा तोळ्याचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:04 IST2021-07-01T04:04:02+5:302021-07-01T04:04:02+5:30

पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार सारिका ललित गंगवाल (४२,रा. शिर्डी) या बुधवारी सकाळी पुतण्याच्या लग्नसमारंभासाठी एस. टी. बसने औरंगाबादेत आल्या. ...

A quarter of an ounce of jewelery snatched from a woman's purse | महिलेच्या पर्समधून पळविले सव्वा तोळ्याचे दागिने

महिलेच्या पर्समधून पळविले सव्वा तोळ्याचे दागिने

पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार सारिका ललित गंगवाल (४२,रा. शिर्डी) या बुधवारी सकाळी पुतण्याच्या लग्नसमारंभासाठी एस. टी. बसने औरंगाबादेत आल्या. महावीर चौकात बसमधून उतरत असताना दोन अनोळखी महिलांनी त्यांना धक्का देत खाली उतरण्यासाठी गर्दी करून त्याच्या पर्सची चेन उघडून त्यातील मिनी पर्स चोरून घेतली. या मिनी पर्समध्ये पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, पाच ग्रॅमची खड्याची अंगठी आणि अडीच ग्रॅमचे कानातील टॉप्स असा ऐवज होता. ही चोरी केल्यावर त्या महिला त्यांच्या दोन लहान लेकरांसह घाईत रिक्षात बसून आकाशवाणीच्या दिशेने निघाल्या. गंगवाल यांना पर्सची चेन उघडी दिसल्याने त्यांनी पर्समध्ये हात घालून पाहिले असता दागिन्याची मिनी पर्स चाेरी झाल्याचे त्यांना समजले. ही चोरी त्या महिलांनी केल्याचा संशय बळावल्याने त्यांनी दुसऱ्या रिक्षातून त्या महिलांचा पाठलाग सुरू केला. त्या आकाशवाणी चौकात त्या महिला रिक्षातून उतरल्या आणि वेगवेगळ्या दिशेने निघून गेल्या. यामुळे त्यांना पकडता आले नाही. यानंतर त्यांनी क्रांती चौक ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Web Title: A quarter of an ounce of jewelery snatched from a woman's purse