चोरट्यांकडून जप्त केलेला सव्वा लाखांचा ऐवज तक्रारदाराला केला परत
By | Updated: November 28, 2020 04:16 IST2020-11-28T04:16:15+5:302020-11-28T04:16:15+5:30
सिडको एन-१ येथील मीनाक्षी जाधव यांचा बंगला फोडून चोरट्यांनी रिव्हाॅल्वर, चांदीच्या वाट्या, समई, फुलपात्र, चमचे, पातेले, सोन्याची अंगठी चोरून ...

चोरट्यांकडून जप्त केलेला सव्वा लाखांचा ऐवज तक्रारदाराला केला परत
सिडको एन-१ येथील मीनाक्षी जाधव यांचा बंगला फोडून चोरट्यांनी रिव्हाॅल्वर, चांदीच्या वाट्या, समई, फुलपात्र, चमचे, पातेले, सोन्याची अंगठी चोरून नेली होती. याविषयी तक्रार आल्यावर पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला होता. शुक्रवारी न्यायालयाच्या आदेशाने पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे, उपनिरीक्षक कैलास अन्नलदास यांनी तक्रारदार मधुकर बापूसाहेब जाधव, गजेंद्र दिलीपराव देशमुख यांना बोलावून त्यांच्याकडे ऐवज सुपूर्द केला.