शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
3
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
4
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
5
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
6
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
7
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."
8
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
9
Video - "मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही..."; डॉक्टरची रुग्णाच्या वडिलांना मारहाण
10
Vastu Shastra: वास्तु शास्त्रानुसार घराच्या 'या' भागात ठेवा मोरपीस, आयुष्यात भरतील नवे रंग!
11
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
12
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
13
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
14
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
15
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
16
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
17
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
18
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
19
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
20
Ramkesh Murder Case: बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?

भांडण मोठ्यांचे; जीव गेला बिचाऱ्या कुत्रीचा, फावड्याचा घाव वर्मी लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 12:05 IST

नारळीबाग येथील घटना : सिटी चौक ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी

औरंगाबाद : दोन कुटुंबांतील वादात सात पिलांची आई असलेल्या कुत्रीचा जीव गेल्याची घटना नारळीबाग येथे मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी दोन्ही कुटुंबांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीनुसार सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संदीप भिसे, सचिन भिसे, अश्विनी भिसे, राणी भिसे (सर्व रा. नारळीबाग) अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान, भिसे यांच्या तक्रारीवरून रितिका निकाळजे, अमोल महाले, प्रीती कांबळे, सुनीता निकाळजे (सर्व रा. धनमंडी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली. प्रीती कांबळे यांच्या फिर्यादीनुसार, ३१ जानेवारीला दुपारी आरोपी संदीप भिसे, सचिन भिसे, अश्विनी भिसे आणि राणी भिसे हे कांबळे यांच्या घरी गेले. तेव्हा कांबळे यांची पाळीव कुत्री त्यांच्यावर भुंकली. तेव्हा सचिन भिसे याने दांडा असलेले फावडे कुत्रीच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यात कुत्री कोसळली. काही वेळातच कुत्रीचा जीव गेला. या कुत्रीने नुकताच सात पिलांना जन्म दिला होता. कुत्रीचा जीव घेतल्यानंतर भिसे कुटुंबीयांनी कांबळे यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांना घरात घुसून मारहाण केली. तुम्ही आमची सुपारी दिली का?, रात्री आम्हाला लोकांनी मारहाण केली, असे म्हणत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हाया प्रकरणी सचिन भिसे यांच्या तक्रारीवरून रितिका निकाळजे, अमोल महाले, प्रीती कांबळे, सुनीता निकाळजे यांच्याविरुद्धही मारहाणीचा गुन्हा नोंदविला गेला आहे. ३० जानेवारीला रात्री ८ वाजता भिसे यांनी भाऊसाहेब खेत्रे यांना ‘राम-राम’ केला होता. त्या कारणावरून आरोपींनी भिसे यांच्यासोबत वाद घातला. त्यांना मारहाण केली. ३१ जानेवारीला दुपारी त्यांची पत्नी, वहिनी यांनाही आरोपींनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीdogकुत्रा