शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

तीन दारुड्यांमध्ये भांडण; एकाचा खून, दुसरा अत्यवस्थ, तिसरा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 18:30 IST

दलालवाडीतील घटना : दारू पिण्याच्या वादातून घडला प्रकार

औरंगाबाद : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या दलालवाडी येथील एका अर्धवट बांधकामाच्या रिकाम्या जागेत दारू पीत बसलेल्या तिघांमध्ये वाद झाला. या वादातूनच एकाचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. दुसरा एक जण गंभीर जखमी झाला. घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान,यातील तिसऱ्या संशयित मारेकऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रिजवान उल हक इम्रान उल हक (३२, रा. सिल्लेखाना परिसर), असे मृताचे, तर वसीम मुक्तार कुरेशी (२८, रा. दलालवाडी), असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. मोहसीन ऊर्फ हमला रमजानी कुरेशी (३०, रा. दलालवाडी), असे फरार संशयिताचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दलालवाडी भागात एका इमारतीचे बांधकाम अर्धवट राहिलेले आहे. सर्व बाजूंनी पत्र्याने जागा बंद केलेली आहे; पण आत जाण्यासाठी एका ठिकाणाहून रस्ता आहे. त्यातून तीन जण दारू, ‘चकणा’ आणि बसण्यासाठी मोठा रुमाल घेऊन गेले होते. 

साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यातील फरार संशयिताने दोघांना भाेसकले. रिजवान उल हक याच्या छातीवर, कानावर, पायावर खोलवर वार करण्यात आले. रिजवान जागीच ठार झाला. वसीम कुरेशी हा गंभीर जखमी आहे. त्याच्याही छातीवर वार केलेले आहेत. त्याच्या छातीतून, नाका, तोंडातून प्रचंड रक्तस्राव झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या दोघांना मारणारा संशयित घटनेनंतर पसार झाला असून, त्याने मोबाइल बंद केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त विशाल ढुमे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, क्रांती चौकचे निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी पथकांसह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर काही वेळात श्वान पथक, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत क्रांती चौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

चाकू अन् दारूचा भरलेला ग्लासघटनास्थळावर खून करण्यासाठी वापरलेला चाकू, दारूने भरलेला ग्लास, पाण्याची बाटली आणि सोबत खाण्यासाठी आणलेली भेळ आढळून आली आहे. दारू प्यायल्यानंतर झालेल्या वादातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

मृतावर दोन गुन्हे दाखलमृत रिजवान उल हक याचा हॉटेल आणि पानटपरीचा व्यवसाय आहे. हल्ला केल्याचे दोन गुन्हे त्याच्यावर क्रांती चौक ठाण्यात दाखल आहेत. मृत, जखमी आणि संशयित आरोपी हे तिघे मित्र असल्याची माहितीही नातेवाइकांनी दिली. संशयित आरोपीने दोन विवाह केलेले असून, दोन्ही घरी गुन्हे शाखेचे पथक जाऊन आले. आरोपीचा शोध गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे, काशीनाथ महांडुळे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, गजानन सोनटक्के, अजित दगडखैर, रावसाहेब जोंधळे, क्रांती चौकचे उपनिरीक्षक विकास खटके यांची पथके घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद