गुणवाढ प्रकरणाने गुणवत्ता धोक्यात

By Admin | Updated: March 24, 2016 00:42 IST2016-03-24T00:24:31+5:302016-03-24T00:42:03+5:30

जालना : शहरातील एका वसतिगृहात बारावीच्या हजारो उत्तरपत्रिका आढळून आल्या. काही पैसे मोजून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा धंदा येथून चालत असे

Quality hazard by quality case | गुणवाढ प्रकरणाने गुणवत्ता धोक्यात

गुणवाढ प्रकरणाने गुणवत्ता धोक्यात

जालना : शहरातील एका वसतिगृहात बारावीच्या हजारो उत्तरपत्रिका आढळून आल्या. काही पैसे मोजून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा धंदा येथून चालत असे. याच पार्श्वभूमीवर लोकमतने सर्वेक्षणाच्या माध्यमातून नागरिकांची मते जाणून घेतली.
नागरिकांना चार प्रश्न विचारण्यात आले. त्यातून नागिरिकांनी होय, नाही माहीत, नाही अशी उत्तरे दिली. गुणवाढ प्रकरणाने शैक्षणिक गुणवत्ता धोक्यात आली आहे का, या वर ७० टक्के नागरिकांनी होेय उत्तर दिले. १० टक्के नागरिकांना नाही असे वाटते तर २० टक्के नागरिकांना याबाबत काहीच माहीत नाही. गुणवत्ता घसरण्यास संपूर्ण यंत्रणाच जबाबदार आहे का? ६० टक्के होय म्हणतात. ३० टक्के जनता यंत्रणेला दोषी मानत नाही तर १० टक्के याबाबत अनभिज्ञ आहेत. विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे का? या प्रश्नावर ५० टक्के नागरिकांनी प्रतिसाद देत होय असे म्हणतात. ३० टक्के वाचकांना मानसिकता बदलण्याची गरज वाटत नाही. २० टक्के नागरिकांना काहीच माहिती नसून त्यांनी उत्तर देण्याचे
टाळले.
निकालाचा टक्का वाढविण्यासाठी हा खटाटोप आहे का? यावर तब्बल ८० टक्के नागरिकांनी याला जोरदार समर्थन देत होय असे उत्तर दिले. १० टक्के नाही म्हणतात. १० टक्के नागरिक तटस्थ आहेत. शहरातील विविध भागातील नारिकांना प्रश्न विचरण्यात आले. याचबरोबर अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. सर्व प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशी मागणीही काही नागरिकांनी या सर्वेक्षणा दरम्यान केली. (प्रतिनिधी)

Web Title: Quality hazard by quality case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.