शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दर्जा अन् ऊर्जा वाढवणार

By admin | Updated: August 10, 2015 00:59 IST

बीड : दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवत ग्रामसेवकांनी तत्पर सेवा देण्याचे निश्चित केले. त्यासाठी उर्जा व दर्जा वाढविण्याचाही संकल्प राज्य ग्रामसेवक युनियनच्या

बीड : दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवत ग्रामसेवकांनी तत्पर सेवा देण्याचे निश्चित केले. त्यासाठी उर्जा व दर्जा वाढविण्याचाही संकल्प राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने आयोजित स्रेह मेळाव्यात रविवारी करण्यात आला. यावेळी ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांनी दिली.येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडलेल्या मेळाव्याचे उद्घाटन ढाकणे यांच्या हस्ते झाले. राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे, एस. बी. तांबोळी, प्रवीण पवार, शिवाजीराव खरात यांची प्रमुख उपस्थिती होती तर ग्रामसेवक संघटनेचे जेष्ठ नेते हनुमंतराव मुरूडकर अध्यक्षस्थानी होते. जिल्हाध्यक्ष नारायण बडे, सदस्य विलासराव देशमुख, सचिव संदीपान लेंडाळ, चेअरमन बाबूराव नन्नवरे व्यासपीठावर उपस्थित होते.ढाकणे म्हणाले, ग्रामसेवकांना शासन व जनता यांच्यात समन्वय साधून काम करायचे असते. शासन योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामसेवकांनी तत्पर रहावे, असे आवाहन त्यांनी केले. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे संघटनेने प्रलंबित मागण्या मांडल्या आहेत. त्यांच्यामार्फत ग्रामसेवकांचे प्रश्न सोडविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. ग्रामसेवकांवर जेथे कोठे अन्याय होईल, तेथे संघटना तातडीने धावून जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले. जेष्ठ नेते मुरुडकर यांनी ग्रामसेवकांनी निडरपणे कामे करावीत असा सल्ला दिला. अन्याय खपवून न घेता एकजुटीने लढा द्या, असेही त्यांनी सांगितले. ‘ग्रामसेवकांसमोरील आव्हाने’ या विषयावर परिसंवादही पार पडला.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नारायण बडे यांनी केले. त्यांनी संघटनेने केलेल्या कार्याचा अहवाल मांडला. तत्पूर्वी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शेकडो ग्रामसेवकांनी हजेरी लावली. (प्रतिनिधी)