विभागात कलचाचणीचा फज्जा
By Admin | Updated: February 17, 2016 00:45 IST2016-02-16T23:49:39+5:302016-02-17T00:45:24+5:30
विजय सरवदे, औरंगाबाद पुढील शिक्षणासाठी आवडी-निवडीनुसार क्षेत्र निवडण्यासाठी शिक्षण मंडळाने शाळास्तरावर दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.

विभागात कलचाचणीचा फज्जा
विजय सरवदे, औरंगाबाद
पुढील शिक्षणासाठी आवडी-निवडीनुसार क्षेत्र निवडण्यासाठी शिक्षण मंडळाने शाळास्तरावर दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. माध्यमिक शाळांनी ८ ते २५ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाईन किंवा आॅफलाईन चाचणी घेणे बंधनकारक असताना दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विभागातील १ लाख ७४ हजार २७७ विद्यार्थ्यांपैकी या आठ दिवसांमध्ये अवघ्या ४ हजार २३२ विद्यार्थ्यांनीच कलचाचणी दिल्याची माहिती समोर आली आहे. काही शाळांनी आॅफलाईन चाचणी घेतल्यामुळे तो अहवाल औरंगाबाद विभागीय मंडळाकडे पोहोचलेला नसला तरी किमान दीड लाख विद्यार्थ्यांनी कलचाचणीबाबत उदासीनता दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे.
विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या पाच जिल्ह्यांमध्ये माध्यमिकच्या २ हजार ४५० शाळा आहेत. या शाळांमधून यंदा दहावीच्या परीक्षेला १ लाख ७४ हजार २७७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना कलचाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. ज्या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत असेल, त्याच शाळेतून त्याने कलचाचणी देणे बंधनकारक आहे. आॅनलाईन कलचाचणी सर्वांना बंधनकारक आहे; पण ज्या शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नसेल त्या शाळांनी कलचाचणीची (पान २ वर)