दाभाडीत हरणाच्या पाडसाला अजगराचा विळखा
By Admin | Updated: October 27, 2015 00:19 IST2015-10-27T00:03:40+5:302015-10-27T00:19:24+5:30
दाभाडी : बदनापूर तालुक्यातील दाभाडी परिसरात हरणाच्या पाडसाच्या गळ्याला अजगराने विळखा घालून आपले भक्ष्य बनविण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.

दाभाडीत हरणाच्या पाडसाला अजगराचा विळखा
दाभाडी : बदनापूर तालुक्यातील दाभाडी परिसरात हरणाच्या पाडसाच्या गळ्याला अजगराने विळखा घालून आपले भक्ष्य बनविण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
दाभाडी येथील गायराणात पाण्यात एक पाडस पडल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले. त्या ठिकाणी ग्रामस्थ केले असत अजगराने त्या पाडसाच्या गळ्याला विळखा घातल्याचे दिसले. पाडस जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. ग्रामस्थांनीही पाडसाला वाचविण्यासाठी अजगराला मारले परंतु तोपर्यंत पाडसाने आपले प्राण सोडले होते. हृदय पिळवून टाकणारा...थरकाप उडविणाऱ्या या घटनेची माहिती कळताच पाडस व अजगराला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. ग्रामस्थांनी अजगराच्या विळख्यातून मृत पाडसास वेगळे करून ग्रामीण रूग्णालयात ठेवले. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांची माहिती दिली. ते अधिकारी मंगळवारी सकाळी येणार असल्याचे सांगण्यात आले.