शहरं
Join us  
Trending Stories
1
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामन, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
2
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
3
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
4
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
5
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
6
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
7
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
8
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
9
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
10
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
11
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
12
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
13
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
14
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
15
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
16
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
17
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
18
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
19
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
20
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट

व्हेंटिलेटर लावले म्हणजे रुग्ण गेला, असे नाही, ८० टक्के रुग्ण ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 17:25 IST

घाटीत ‘मास्टरक्लास इन मेकॅनिकल व्हेंटिलेटशन'मध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगर : ‘ व्हेटिंलेटर लावले म्हणजे रुग्ण गेला’ असा सर्वसामान्यांचा समज आहे. परंतु हे चूक आहे. गंभीर- अतिगंभीर रुग्णांच्या उपचारासाठी व्हेंटिलेटर अत्यावश्यक ठरते. व्हेंटिलेटरवरील ६० ते ८० टक्के रुग्णांचा जीव वाचतो. त्यासाठी व्हेंटिलेटरच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव व व्यावहारिक प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरते, असा सूर रविवारी घाटीत पार पडलेल्या ‘मास्टरक्लास इन मेकॅनिकल व्हेंटिलेटशन' या कार्यशाळेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी ‘आयएमए’चे अध्यक्ष डाॅ. अनुपम टाकळकर, इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनच्या (आयएससीसीएम) शहर शाखेचे अध्यक्ष डॉ. योगेश लक्कस, सचिव डॉ. राहुल चौधरी, कोषाध्यक्ष डॉ. प्रशांत वळसे, घाटीतील मेडिसीन विभागप्रमुख डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, डाॅ. गायत्री तडवळकर, डाॅ. सुरेश हरबडे, डाॅ. प्रसाद देशपांडे, डाॅ. सुचिता देशपांडे, डाॅ. श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांची उपस्थिती होती.परिषदेत ‘आयएससीसीएम’चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष डॉ. अक्षय छल्लाणी, मुंबई येथील डॉ. भरत जगियासी, डॉ. रवींद्र घावट, पुणे येथील खातीब खालिद यांनी मार्गदर्शन केले.

२०० डाॅक्टरांचा सहभागया मास्टरक्लासमध्ये २०० डॉक्टर्स, कन्सल्टंट्स व पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रि-वर्कशॉप लेक्चर्स, हँड्स-ऑन ट्रेनिंग तसेच पेपर व पोस्टर प्रेझेंटेशन, आदींतून 'आयसीयू'मध्ये व्हेंटिलेटरच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव व प्रशिक्षण देण्यात आले.

व्हेंटिलेटरवरील रुग्ण दीड महिन्याने पायी घरीडाॅ. योगेश लक्कस म्हणाले, व्हेंटिलेटरवर दीड महिने असलेले रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून पायी घरी गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानंतर फुप्फुस निकामी झाल्यानंतर व्हेंटिलेटर रुग्णाचा जीव वाचविणारी प्रणाली ठरते. या व्हेंटिलेटरमध्ये वेगवेगळे ‘मोड’ असतात. रुग्णाच्या प्रकृतीनुसार त्याचा वापर करावा लागतो. आयसीयूतज्ज्ञ म्हणजे रुग्णालयाचे ‘बॅकबोन’ असतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Ventilator isn't end; 80% recover fully, says experts

Web Summary : Ventilators are vital for critical patients, saving 60-80% lives. Experts emphasized modern technology training at a workshop. Doctors highlighted success stories, noting patients walking home after ventilator support. ICU specialists are essential for patient care.
टॅग्स :hospitalहॉस्पिटलchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर