औरंगाबाद : मी तुमच्या भावाकडून नेहमी माल खरेदी करतो, आता काही दागिने हवे आहेत आणि त्याचा हिशेब तुमचा भाऊ आल्यानंतर करू, असे तो म्हणाला, तेव्हा त्यांनी माझा भाऊ अर्ध्या तासानंतर दुकानात येईल, असे दुकानदाराने सांगितले.यावेळी त्याने काही दागिने दाखविण्यास सांगितले. पावटेकर यांनी चार तोळ्याचे झुबके मोजून काऊंटरवर ठेवले. याप्रसंगी आरोपीने खिशातून मिरची पावडर काढून अचानक पावटेकर यांच्या चेहऱ्यावर फेकली आणि काऊं टरवर ठेवलेले चार तोळ्याचे दागिने घेऊन तो पसार झाला. डोळ्यात मिरची पावडर गेल्याने पावटेकर हे प्रचंड घाबरले आणि आरडाओरड करीत दुकानातून बाहेर आले.या घटनेची माहिती सिटीचौक पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक नागनाथ कोडे, सहायक निरीक्षक सिद्दीकी यांनी दुकानात जाऊन पाहणी केली. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोळ्यात मिरची पावडर टाकून सराफाला लुटले
By admin | Updated: August 17, 2014 01:29 IST
आरोपीने खिशातून मिरची पावडर काढून अचानक पावटेकर यांच्या चेहऱ्यावर फेकली आणि काऊं टरवर ठेवलेले चार तोळ्याचे दागिने घेऊन तो पसार झाला.
डोळ्यात मिरची पावडर टाकून सराफाला लुटले
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}