डोळ्यात मिरची पावडर टाकून सराफाला लुटले
By Admin | Updated: August 17, 2014 01:44 IST2014-08-17T01:39:28+5:302014-08-17T01:44:38+5:30
औरंगाबाद : दागिने खरेदी करण्याच्या निमित्ताने दुकानात घुसलेल्या गुन्हेगारांनी सराफाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटमार केल्याची घटना १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी घडली.

डोळ्यात मिरची पावडर टाकून सराफाला लुटले
औरंगाबाद : दागिने खरेदी करण्याच्या निमित्ताने दुकानात घुसलेल्या गुन्हेगारांनी सराफाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटमार केल्याची घटना १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी घडली.
यावेळी गुन्हेगारांनी त्यांच्या दुकानातून चार तोळ्याचे दागिने लुटले. या घटनेने व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे.
सिटीचौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शाहिद सिद्दीकी यांनी याविषयी सांगितले की, पानदरिबा येथे अभिषेक अनिल पावटेकर (रा. विठ्ठलधाम अपार्टमेंट) यांचे अग्रसेन भवनसमोर दागिन्यांचे दुकान आहे.
१५ आॅगस्ट रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास पावटेकर हे एकटेच दुकानात बसलेले होते. त्यावेळी आरोपीने स्वत:चे नाव उदावंत असून स्वत: सुवर्ण व्यापारी असल्याचे सांगितले व पावटेकर यांच्या भावाचे नाव घेऊन तो कोठे आहे, असे विचारले. तो आपल्याला चांगल्याप्रकारे ओळखत असल्याचेही त्याने त्यांना सांगितले.