पुष्कर श्रोत्रीच्या ‘पूर्वी लुम्बिबा’ने नाट्यगृह घेतले डोक्यावर...

By Admin | Updated: December 22, 2014 23:44 IST2014-12-22T23:44:46+5:302014-12-22T23:44:46+5:30

जालना : लोकमत सखीमंच व प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धम्माल विनोदी ‘हसवा फसवी’ या नाटकास सखीमंच सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत,

Pushkar Shrotti's 'Lumbiba' played a theater in the head ... | पुष्कर श्रोत्रीच्या ‘पूर्वी लुम्बिबा’ने नाट्यगृह घेतले डोक्यावर...

पुष्कर श्रोत्रीच्या ‘पूर्वी लुम्बिबा’ने नाट्यगृह घेतले डोक्यावर...


जालना : लोकमत सखीमंच व प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धम्माल विनोदी ‘हसवा फसवी’ या नाटकास सखीमंच सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, पुष्कर श्रोत्री यांच्या एकाहून एक सरस अदाकारीने सखीमंच सदस्यांवर चांगलेच गारुड केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण केली. यावेळी प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष विलासराव खरात, चेअरमन मुकेश ओसवाल, व्हाईस चेअरमन दादाराव अटकळ, संचालक डॉ. डी.आर.चव्हाण, एन.बी.पगारे, महाव्यवस्थापक प्रदीप गर्जे पाटील यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष विलासराव खरात यांनी उपस्थित सखीमंच सदस्यांना बँकेच्या वतीने सुरु असलेल्या विविध योजनाबद्दल मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, प्रियदर्शनी बँकेस सखीमंच सदस्यांनी आवर्जुन भेट द्यावी, महिलांसाठी सुरु असलेल्या योजनांची माहिती घ्यावी. बँकेत खाते उघडून एटीएमसह अन्य सुविधांचा लाभ घ्यावा. प्रियदर्शनी बँकही महिलांचीच बँक असून, या बँकेत ७० टक्के महिला उत्कृष्टपणे काम करीत आहेत. महिलांच्या कर्तबगारीमुळेच बँकेस यावर्षीचा महाराष्ट्र अर्बन बँक फेडरेशनच्या वतीने बँक २०१४ सर्वोत्कृष्ट बँक म्हणून गौरविण्यात आले.
पुष्कर श्रोत्री यांनी विविध बहुरंगी सहा भूमिका साकारुन सखीमंच सदस्यांना अक्षरश: अडीच तास हस्यकल्लोळात बुडविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुराधा भोसले यांनी केले. (प्रतिनिधी)४
पुष्कर श्रोत्री यांनी सुरुवातीस चिमनरावांची भूमिका साकारत अस्सल पुणेकरांची आठवण करुन दिली. चायनीज भूमिकेत चिंगपाँग हा चायनीज नवऱ्याची अफलातून भूमिका साकारुन महिलांच्या टाळ्या मिळविल्या. कोंबड्याचा व्यापारी, जिब्राणिया येथे स्थाईक झालेली पूर्वी पटेल लुम्बिबा ही महिलेच्या वेषातील अफलातून भूमिका सादर होताच सखीमंच सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेतले.
४त्यानंतर वेस्टर्न पद्धतीचा बॉबही उत्कृष्ट सादर केला. हेरंबकर यांची भूमिका सादर करुन महिलांना वास्तव परिस्थितीचे भान करुन दिल्याने सभागृह काहीवेळ भावूक झाले होते. पुष्कर श्रोत्री यांच्या सोबत सतीश जोशी या कलाकाराने साकारलेली वाघमारेंची भाव खाऊन गेली. वैखरी पाठक यांनी उत्कृष्ट साद दिली. या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेने स्वीकारले होते.
दीपप्रज्वलन ... लोकमत सखीमंच व प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक यांच्या सहकाऱ्याने आयोजित हसवा फसवी या विनोदी नाटकाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी बँकेचे संस्थापक अध्यक्ष विलासराव खरात, चेअरमन मुकेश ओसवाल, महाव्यवस्थापक प्रदीप गर्जे पाटील. अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी साकारलेली महिला वेशातील भूमिका लक्षवेधी ठरली.

Web Title: Pushkar Shrotti's 'Lumbiba' played a theater in the head ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.