बिराजदार की दंडनाईक ?

By Admin | Updated: May 19, 2015 00:48 IST2015-05-19T00:17:55+5:302015-05-19T00:48:22+5:30

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडी १९ मे रोजी होत असून, उपाध्यक्षपद भाजपाचे नवनिर्वाचित संचालक कैलास शिंदे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे

The punter of the irony? | बिराजदार की दंडनाईक ?

बिराजदार की दंडनाईक ?



उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडी १९ मे रोजी होत असून, उपाध्यक्षपद भाजपाचे नवनिर्वाचित संचालक कैलास शिंदे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदाची माळ सतीश दंडनाईक आणि सुरेश बिराजदार यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात पडते याबाबत उत्सुकता आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी १९ मे रोजी दुपारी १ ते १.३० या वेळेत नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर १.३० ते २ या वेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार असून, २ ते २.१५ या वेळेत नामनिर्देशनपत्राची छाननी होणार आहे. २.१५ ते २.४५ ही वेळ अर्ज मागे घेण्यासाठी आहे. त्यानंतर आवश्यकता पडल्यास दुपारी ३ वाजता मतदान होऊन त्यानंतर लगेच मतमोजणी घेऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. जिल्हा बँकेमध्ये राष्ट्रवादीचे आठ, भाजपा १ तर सेना-काँग्रेसचे प्रत्येकी ३ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष ही दोन्ही पदे राष्ट्रवादी-भाजपकडे अपेक्षित आहे.
भाजपाचे एकमेव सदस्य कैलास शिंदे यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी सतीश दंडनाईक आणि सुरेश बिराजदार यांची नावे चर्चेत आहेत. दंडनाईक आणि बिराजदार आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे विश्वासु सहकारी म्हणून ओळखले जातात. याबरोबरच या दोघांनाही बँकींग क्षेत्राचा दांडगा अनुभव असल्याने अध्यक्षपदासाठी या दोघांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा बँक निवडणूकीच्या निमित्ताने जिल्ह्यात राष्ट्रवादी-भाजपा मध्ये पहिल्यांदाच मैत्रीचे पर्व सुरु झाले असून, ही नवी आघाडी अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेला बाहेर कसे काढते. याकडेही जिल्ह्याचे लक्ष आहे.
जिल्हा बँक निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर राष्ट्रवादी-भाजपाला या निवडणूकीत पुर्ण बहुमत मिळाल्यानंतरही विरोधकातील एका गटाने अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी काही चमत्कार घडविता येतो का? याचा शेवटपर्यंत प्रयत्न केल्याने खबरदारी म्हणून राष्ट्रवादी-भाजपाचे सर्व नऊ संचालक अज्ञातस्थळी सहलीवर रवाना करण्यात आले होते. हे सर्व सदस्य दुपारी एकच्या सुमारास एकत्रितपणे निवडस्थळी येवून निवड प्रक्रियेत सहभाग नोंदवितील.

Web Title: The punter of the irony?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.