शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

'पुणे - लातूर - अमरावती' रेल्वे आता पुन्हा धावणार; लातूरकरांसाठी तीन नव्या रेल्वेगाड्या!

By राजकुमार जोंधळे | Updated: December 3, 2022 17:09 IST

१६ डिसेंबरपासून पुणे-लातूर-अमरावती रेल्वेगाडी सुरू करण्यात येणार आहे.

- राजकुमार जोंधळे लातूर : गत दोन वर्षांपूर्वी बंद केलेली पुणे - लातूर - अमरावती एक्स्प्रेस रेल्वे आता आठवड्यातून दोन वेळा धावणार आहे. विशेष म्हणजे, लातूरकरांच्या सोयीसाठी रेल्वेगाडीचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. लातूर - पुणे इंटरसिटीची मागणी असून, यासाठी खा. सुधाकर शृंगारे यांनी पाठपुरावा केला आहे. आता लवकरच ही रेल्वे सुरू हाेणार आहे. प्रवासी भारमार वाढल्यानंतर आठवड्यात दोन फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्यामसुंदर मानधना म्हणाले, १६ डिसेंबरपासून पुणे-लातूर-अमरावती रेल्वेगाडी सुरू करण्यात येणार आहे. काेराेना काळात अनेक रेल्वेगाड्या बंद केल्या हाेत्या. त्यात याही गाडीचा समावेश होता. मात्र, खासदारांच्या प्रयत्नांतून ती पुन्हा सुरू केली जात आहे. आठवड्यात शुक्रवार आणि रविवारी रेल्वे पुणे स्थानकातून लातूर, अमरावतीकडे मार्गस्थ होईल. परतीच्या प्रवासात रविवार आणि मंगळवारी अमरावती येथून लातूर मार्गे पुण्याकडे मार्गस्थ हाेईल.

लातूर स्थानकात पहाटे पाेहोचणार...पुणे स्थानकावरून ही रेल्वे रात्री १०.५० मिनिटांनी मार्गस्थ हाेणार आहे. लातूर स्थानकावर पहाटे ५.३० मिनिटांनी पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही रेल्वे अमरावतीवरून रात्री ७.५० वाजता मार्गस्थ हाेणार असून, लातूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३५ वाजता पोहोचेल. तर पुणे शहरात दुपारी ४.२० वाजता पोहोचणार आहे. या रेल्वेगाडीचे पूर्वीचे वेळापत्रक लातूरकरांसाठी गैरसाेयीचे हाेते. मध्यरात्री २.३० वाजता ही रेल्वेगाडी लातूर स्थानकावर येत होती.

पुणे स्थानकातून मार्गस्थ हाेणार...या गाडीला उरळी कांचन येथे थांबा देण्यात आला आहे. पुणे, कुर्डुवाडी, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी, पूर्णा, हिंगोली, अकोला, अमरावती असा मार्ग राहणार आहे. गाडीचा क्रमांक ०१४३९ असून, परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१४४० राहणार आहे.

या आठवड्यात तीन नवीन रेल्वे...सोलापूर - लातूर - तिरुपती, सोलापूर - लातूर - कुर्ला या दोन गाड्या सुरू केल्यानंतर पुणे - लातूर - अमरावती ही रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी खा. सुधारक श्रृंगारे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. या आठवड्यात तीन नवीन रेल्वेगाड्या लातूर स्थानकातून धावत आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेpassengerप्रवासी