पुंडलिकनगर गल्ली नं. ३ व ५ मधील रस्ते झाले गुळगुळीत
By Admin | Updated: July 13, 2014 00:45 IST2014-07-13T00:38:28+5:302014-07-13T00:45:45+5:30
औरंगाबाद : सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे आणि ड्रेनेज लाईनचे उद्घाटन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.

पुंडलिकनगर गल्ली नं. ३ व ५ मधील रस्ते झाले गुळगुळीत
औरंगाबाद : शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या आमदार निधीतून करण्यात आलेल्या पुंडलिकनगर गल्ली नं. ३ व ५ मधील सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे आणि भारतनगरमधील समर्थनगरमध्ये टाकण्यात आलेल्या ड्रेनेज लाईनचे उद्घाटन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी नागरिकांचा उत्साह आणि जल्लोष दिसून आला.
विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीशी जनता समर्थपणे उभी असते, असे त्या कार्यक्रमांतून स्पष्ट झाले. रस्त्यांमुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे. पावसाळ्यात नागरिकांना रस्त्यांवरील चिखलामुळे त्रास होत असे. सिमेंट काँक्रिटीकरणातून झालेल्या गुळगुळीत रस्त्यांमुळे पुंडलिकनगर परिसर शहरातील हायप्रोफाईल वसाहतींच्या यादीत आला आहे. फटाक्यांच्या आतषबाजीत नागरिकांनी शिक्षणमंत्र्यांचे स्वागत केले.
पुंडलिकनगर वॉर्ड क्र. ८३, गल्ली नं.५ मधील चव्हाण यांच्या घरापासून जनता मेडिकलपर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे व श्रीनाथ ज्वेलर्स ते नाल्यापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे, गल्ली नं. ३ मधील कल्याण कावरे यांच्या घरापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत सिमेंट रस्त्याचे, तसेच त्याच गल्लीतील गजानननगर ते मुख्य रस्त्यापर्यंत सिमेंट रस्त्याचे लोकार्पण शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले.
या कार्यक्रमांना नगरसेवक सूर्यकांत जायभाये, साई शेलार, अशोक दामले, सिद्धार्थ वडमारे, बसवराज पवार, शिवा महाले, अभिमन्यू खंडारे, कृ.उ.बा.चे माजी संचालक पंक ज फुलपगर, गौतम माळकरी, जालिंदर शेंडगे, राधाकृष्ण गायकवाड, दामोदर शिंदे, बबन डिडोरे, भागवत भारती, बापू आवारे, भगवान भोसले, कल्याण कावरे, दिगंबर सोनवणे, नारायण पारटकर, सचिन भालेराव, ज्योती भालेराव, रंगनाथ खेडकर आदींसह परिसरातील शेकडो महिला व नागरिकांची उपस्थिती होती.
भारतनगरमधील ड्रेनेज लाईनचे उद्घाटन
वॉर्ड क्र. ८२, भारतनगर येथे टाकण्यात आलेल्या ड्रेनेज लाईनचे उद्घाटन परिसरातील ज्येष्ठ नागरिक व्यवहारे काका यांच्या हस्ते झाले. ड्रेनेज लाईन झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहणार नाही. ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे सांडपाण्याचे डबके साचून साथरोगांचा प्रादुर्भाव होत असे. ड्रेनेज लाईनसाठी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी निधी दिल्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले. यावेळी डॉ. बाबासाहेब पैठणे, मुकेश सोनवणे, शेख रईस, अ. रहीम पटेल, अनिल बरगे, देवराव लुटे, दीपक साळवे, आबा चंदनसे, विकास उगवले, पिंजरकर, काकडे यांच्यासह अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.