शेतकऱ्यांना मिळणार पंपसंच!

By Admin | Updated: December 28, 2015 00:16 IST2015-12-28T00:04:23+5:302015-12-28T00:16:29+5:30

जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेतून २०१५-१६ अंतर्गत ५० टक्के अनुदान तत्त्वावर शेतकऱ्यांना पंप संच तसेच डिझेल इंजिनचा पुरवठा करण्यात येणार आहे.

Pumps will get the farmers! | शेतकऱ्यांना मिळणार पंपसंच!

शेतकऱ्यांना मिळणार पंपसंच!


जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेतून २०१५-१६ अंतर्गत ५० टक्के अनुदान तत्त्वावर शेतकऱ्यांना पंप संच तसेच डिझेल इंजिनचा पुरवठा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा आहे. मात्र पंप अथवा डिझेल इंजिन नसल्याने शेतीला पाणी देताना अडचणी येतात. पावसाच्या भरोशावर बारमही शेती होऊ शकत नाही. उपकर योजनेतून ३० लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनुदान ३० लाख व लोकवाटा ४० लाख मिळून ७० लाख रूपयांची खरेदी करता येणार आहे. यात ३, ५ व साडेसात अश्वशक्तिचे वीजपंप व डिझेल इंजिन लाभार्थ्यांना मिळणार आहे. सदर प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.
अनुदान तत्ववार पंप मिळणार असल्याने शेतकऱ्यांना कमी किंमतीत पंप मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे परंतु वीज पंपाअभावी शेतीला पाणी देता नव्हते. या योजनेमुळे शेतकऱ्यास पंप खरेदी करता येईल. शेतकऱ्यांच्या जात प्रवर्गनिहाय या पंपांचा पुरवठा होणार आहे.
याविषयी कृषी विकास अधिकारी गंजेवार म्हणाले, लाभार्थ्यांच्या मागणीनुसार पंप पुरवठा करण्यात येणार आहे. पंचायत समितीस्तरावर लाभार्थ्यांचे अर्ज प्रस्ताव आलेले आहेत. मागणीनुसार पंप पुरवठा करण्यात येईल. आठ तालुके मिळून अंदाजे २०० लाभार्थींना पंप पुरवठा होईल. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या ९ सप्टेंबर २०१५ रोजी झालेल्या सर्व साधारण सभेतही पंप खरेदीच्या ठरावास मंजुरी मिळाली होती. मात्र अद्यापही लाभार्थ्यांना हे वीजपंप मिळाले नाहीत. सदर पंप खरेदीसाठी आॅर्डर देण्यात आली असून, काही दिवसांत पंचायत समितीच्या गोदामात पंप दाखल होतील, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला.
४आगामी उन्हाळा व पाणी पातळी लक्षात घेता वीजपंपांचा पुरवठा तात्काळ करावा, अशी मागणी होत आहे. फेब्रुवारी मार्च
महिन्यात पाणी ाातळी मोठ्या प्रमाणात खालावते अथवा विहिरी कोरड्या पडतात. यामुळे पाणी पातळी खोल जाण्याच्या आत पंप पुरवठा करण्याची गरज असून, हे पंप लवकरात लवकर मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Pumps will get the farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.