पल्स पोलिओ लसीकरण अभियान ३१ जानेवारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:15 IST2021-02-05T04:15:55+5:302021-02-05T04:15:55+5:30
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार होती, मात्र ऐनवेळी रद्द करण्यात आली. आता ३१ जानेवारीला ...

पल्स पोलिओ लसीकरण अभियान ३१ जानेवारीला
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार होती, मात्र ऐनवेळी रद्द करण्यात आली. आता ३१ जानेवारीला पुन्हा एकदा पल्स पोलिओ अभियान पूर्ण भारतभर राबविण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार २०२० यावर्षी अफगाणिस्तानमध्ये ५६ व पाकिस्तानमध्ये ८४ मुले पोलिओमुळे अपंग झाली आहेत. विदेशी पर्यटकांमुळे पोलिओचा विषाणू आपल्या मुलांपर्यंत पोहोचू शकतो. एखाद्या व्यक्तीला पोलिओमुळे अपंगत्व आले, तर ते पूर्ण बरे करता येत नाही. नियमित लसीकरणामध्ये १०० टक्के पालक लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. भारतात मोठ्या प्रमाणात दररोज मुले जन्माला येतात. आतड्याची रोगप्रतिकार शक्ती तयार करण्यासाठी पोलिओ ड्रॉपची आवश्यकता असते. एकाचवेळी लसीकरण केल्याने सामाजिक रोगप्रतिकार शक्ती तयार होते. या सर्व कारणांमुळे ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना पोलिओ लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.
एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून बाजार, धार्मिक स्थळे, रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅन्ड प्रवासी यांचे लसीकरण यात करण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना लस देऊन पोलिओ विषाणूपासून संरक्षित करण्याचे आवाहन मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी यावेळी केले.
----