पुलकसागर महाराज जन्मोत्सव सुरू

By Admin | Updated: May 13, 2014 00:57 IST2014-05-13T00:27:29+5:302014-05-13T00:57:58+5:30

औरंगाबाद : अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच आणि राष्ट्रीय जैन महिला जागृती मंचच्या वतीने राष्ट्रसंत पुलकसागरजी महाराज यांच्या ४४ व्या जन्मोत्सवास सुरुवात करण्यात आली.

Pulkasagar Maharaj Janmotsav is going on | पुलकसागर महाराज जन्मोत्सव सुरू

पुलकसागर महाराज जन्मोत्सव सुरू

औरंगाबाद : अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच आणि राष्ट्रीय जैन महिला जागृती मंचच्या वतीने राष्ट्रसंत पुलकसागरजी महाराज यांच्या ४४ व्या जन्मोत्सवास सुरुवात करण्यात आली. राजाबाजार येथील जैन मंदिरात सकाळी नीता गोधा यांच्या हस्ते शांतीमंत्र, अभिषेक झाला. शांतीनाथ भगवान, पार्श्वनाथ भगवान, शीतलनाथ मुनीश्री, पुलकसागर महाराज यांची विधान पूजाअर्चा ग्यानचंद अजमेरा यांच्या हस्ते केली. रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, सुनील काला, ललित पाटणी, कचनेर ट्रस्टचे उपाध्यक्ष माणिकचंद गंगवाल, पुलक मंचचे अध्यक्ष प्रसाद पाटणी, जनजागृती महिला मंचच्या अध्यक्षा कला पांडे, सिडकोच्या अध्यक्षा ललिता गंगवाल, अरिहंतनगरच्या अध्यक्षा नीता गोधा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. २१ जणांंनी उत्स्फूर्त रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शांतीलाल पाटणी, मोहित पहाडे, पारस गोधा, राजू सवईवाला, लोहाडेमामा, अरुण पाटणी, डॉ. सुरेश कासलीवाल, महावीर पाटणी, सुनील पांडे, अनिल पाटणी, संतोष पापडीवाल, दिलीप कासलीवाल आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Pulkasagar Maharaj Janmotsav is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.