देवगिरी बँकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:33 IST2020-12-17T04:33:46+5:302020-12-17T04:33:46+5:30

औरंगाबाद : देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. बँकेच्या मुख्य ...

Publication of Devagiri Bank Calendar | देवगिरी बँकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

देवगिरी बँकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

औरंगाबाद : देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले.

बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित सोहळ्यात दोन दिनदर्शिकांचे प्रकाशन झाले. यात वैयक्तिक व व्यावसायिक अशा दोन दिनदर्शिकांचा समावेश आहे. यावेळी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, उपाध्यक्ष प्रा. संजय गायकवाड, संचालक जयंत अभ्यंकर, संदीप पंडित, राजेश सावळकर व संचालक मंडळाची उपस्थिती होती. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून बँकेचे विविध उपक्रम, कोरोनाकाळातील बँकेच्या सामाजिक कार्याबद्दलची माहिती देण्यात आली. ही दिनदर्शिका बँकेच्या सर्व शाखांतून ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुलकर्णी, प्रशासन विभागप्रमुख दत्ता शिंदे, वसुली विभागप्रमुख सुधीर देशपांडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Publication of Devagiri Bank Calendar