सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार चव्हाट्यावर
By Admin | Updated: November 16, 2015 00:36 IST2015-11-15T23:40:03+5:302015-11-16T00:36:54+5:30
गंगाराम आढाव , जालना सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार माहितीच्या अधिकाराखाली चव्हाट्यावर आला आहे. विविध कामांच्या शिफारस पत्रांवर एकूण २५ लाख रुपयांच्या कामांचा स्पष्ट उल्लेख असताना

सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार चव्हाट्यावर
गंगाराम आढाव , जालना
सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार माहितीच्या अधिकाराखाली चव्हाट्यावर आला आहे. विविध कामांच्या शिफारस पत्रांवर एकूण २५ लाख रुपयांच्या कामांचा स्पष्ट उल्लेख असताना संबंधित अभियंत्यांनी १ कोटींचा कार्यारंभ आदेश दिल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश होऊनही त्याचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे.
येथील सार्वजनिक बांधकाम विभागात मोजमाप पुस्तिकेच्या घोळाप्रमाणेच कामांच्या शिफारशीची रक्कम आणि वर्क आर्डर दिलेल्या रकमेत मोठ्या प्रमाणात घोळ झालेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यात भोकरदन, बदनापूर व जालना येथील अभियंते, लेखाधिकारी व संबंधित कंत्राटदार यांनी संगनमताने हा गैरव्यवहार केल्याची चर्चा होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे औरंगाबाद येथील अधीक्षक अभियंता यांनी काम पडताळणीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक जालना यांनी कार्यारंभ आदेश व कामांच्या शिफारस पत्रांची पडताळणी केली होती.
या पडताळणीत प्रत्यक्ष कामाची रक्कम आणि कार्यारंभ आदेश यात मोठ्याप्रमाणात तफावत आढळून आले होते. शिफारस पत्रावर एक काम दोन लाख रुपयांचे असताना त्याकामांचे कार्यारंभ आदेश सुमारे दहा लाखाचे देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.