सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे झाले गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:26 IST2017-08-25T00:26:44+5:302017-08-25T00:26:44+5:30
लालबाग, कन्हैय्यानगर परिसरात बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचे दरवाजे गायब असल्याचे ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले.

सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे झाले गायब
जालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जालना शहर हगणदारीमुक्त झाल्याचे पालिकेने ठराव घेऊन घोषित केले. मात्र, शहरातील अनेक भागात नागरिक आजही उघड्यावर शौचास जात आहे. लालबाग, कन्हैय्यानगर परिसरात बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचे दरवाजे गायब असल्याचे ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले.
जालना शहरात ४२ ठिकाणी नागरिक उघड्यावर शौचास जातात. ही ठिकाणी निष्कासित करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम राबवली. गूड मार्निंग पथकामार्फत उघड्यावर शौचास जाणाºया नागरिकांवर पोलीस कारवाई करण्यात आली. तसेच ज्या भागात नागरिक उघड्यावर शौचास जातात अशा ठिकाणी प्राधान्याने सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. मात्र, देखभाल दुरुस्तीअभावी या स्वच्छतागृहांची काही महिन्यातच दुरवस्था झाली आहे. कन्हैय्यानगर भागातील बहुतांश शौचालये बंद आहेत. तसेच लालबाग परिसरात बसविण्यात आलेल्या स्वच्छतागृहांचे लोखंडी दरवाजे काहींनी गायब केले आहे. काही स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटल्यामुळे वापर बंद आहे. शिवाय या परिसरात नागरिक उघड्यावर शौचास बसत आहेत. त्यामुुळे स्वच्छतागृह बांधण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. जुना जालना भागातील संजयनगर, श्रीकृष्णनगर, मोतीतलाव भागातही नागरिक उघड्यावर शौचास जात असल्याचे दिसून आले.