लोकसेवा करणाराच खरा साधू

By Admin | Updated: November 8, 2015 23:37 IST2015-11-08T23:25:11+5:302015-11-08T23:37:17+5:30

गुंजोटी : जी व्यक्ती ज्ञानदान, अन्नदान आणि गरजुंना रक्तदान करते त्याच व्यक्तीला साधुत्वाची, देवत्वाची जाण असते़ दानाला व सेवेला श्रध्देचा भाव असावा़

Public service is the true saint | लोकसेवा करणाराच खरा साधू

लोकसेवा करणाराच खरा साधू


गुंजोटी : जी व्यक्ती ज्ञानदान, अन्नदान आणि गरजुंना रक्तदान करते त्याच व्यक्तीला साधुत्वाची, देवत्वाची जाण असते़ दानाला व सेवेला श्रध्देचा भाव असावा़ दान हे सत्य संकल्पासाठी असावे़ लोकसेवा करणारा खरा साधू असतो. म्हणून १९ व्या शतकात महात्मा फुले यांनी वंचितांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले़ मुलींसाठी शाळा, अस्पृश्यांना शिक्षण देण्याचे काम केले़ शिक्षण ही क्रांती म्हणजेच रांजले- गांजलेल्यांची जागृती होती, असे प्रतिपादन ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा तुकोबारायांचे वंशज ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ़ सदानंद मोरे यांनी केले़
गुंजोटी येथे शनिवारी वृध्द दिन व राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी अ‍ॅड़ प्रदीप शहा तर आ़ ज्ञानराज चौगुले, अस्मिता विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ़ दामोदर पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होती़
डॉ़ मोरे म्हणाले, स्वामी दयानंद महर्षी, संत गाडगेबाबा, शाहू महाराज यांचे कार्य ‘त्यासी म्हणे जो आपुला’ याचीच प्रचिती होती़ त्यांनी समाजातील दीन-दुबळे, अपंग, गरीब, हतबल, अशिक्षितांची सेवा केली, असेही ते म्हणाले़ प्रास्ताविक डॉ़ दामोदर पतंगे यांनी केले़ कार्यक्रमास प्राचार्य वेदकुमार वेदालंकार, संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकरराव हिरवे, प्राचार्य डी़ आऱ कुलकर्णी, अ‍ॅड़ प्रदीप पणुरे, सुभाष पतंगे, संचालक रत्नाकर पतंगे, प्रज्ञा पतंगे, प्रा़ किरण सगर, प्रा़ अभयकुमार हिरास, सरपंच शंकरराव पाटील, उपसरपंच शिवाजी गायकवाड, मुख्याध्यापक जी़ के़ घोडके, उपप्राचार्य टी़एस़चौधरी, सत्कारमुर्ती शिवानंद बुदले, कॉ़ अरूणकुमार रेणके आदी उपस्थित होते़ कार्यक्रमासाठी जी़डी़हंचाटे, विनोद पतंगे, अभयकुमार हिरास, प्रा़ मारूती खमितकर आदींनी परिश्रम घेतले़ हरिप्रसाद नगरकर यांनी आभार मानले़

Web Title: Public service is the true saint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.