राष्ट्रशक्ती संघटना करणार ‘नोटा’विषयी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:35 IST2019-03-30T23:34:50+5:302019-03-30T23:35:02+5:30
राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-आॅर्डिनेशन संघटनेतर्फे नुकतीच पंढरपूर येथे बैठक घेवून सरकारच्या निषेधार्थ ‘नोटा’ला मतदान करण्याचा निर्धार करुन या विषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रशक्ती संघटना करणार ‘नोटा’विषयी जनजागृती
वाळूज महानगर: राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-आॅर्डिनेशन संघटनेतर्फे नुकतीच पंढरपूर येथे बैठक घेवून सरकारच्या निषेधार्थ ‘नोटा’ला मतदान करण्याचा निर्धार करुन या विषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पॅनकार्ड क्लब गुंतवणूक दाराचे प्रश्न सोडविण्यात सरकारला अपयश आले आहे. कोट्यावधी रुपये गुंतून पडल्याने गुंतवणूकदाराची आर्थिक कोंडी झाली आहे. यासाठी गुंतवणूकदारांनी अनेकवेळा अर्ज, विनंत्या, आंदोलने केली आहेत. अनेकवेळा मागणी करुनही सरकार दखल घेत नसल्याने गुंतवणूकदारांनी एकत्र येवून राष्टशक्ती इन्व्हेस्टर्स को-आॅर्डिनेशन संघटनेची स्थापना करुन या प्रश्नावर लढा उभारला आहे. तसेच नोटाला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अनुषंगाने संघटनेचे जिल्हा अध्यक्ष उदयकुमार तोतला यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथील वैष्णोदेवी उद्यान येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीला एम.डी. खाडे, एस.बी. जगताप, ए.डी. दाणे, एम.डी. चव्हाण, एस.एस. धोत्रे, आर.बी. महाजन, ए.आर. कदम, जाकीर शेख, एस.आर. तोतला, एस.आर. जाधव, एस.व्ही. गावंडे, एस.के. समर्थ आदी उपस्थित होते.