युथ पार्लमेंटचा मुलांवर मनोवैज्ञानिक प्रभाव
By Admin | Updated: May 8, 2016 01:05 IST2016-05-08T00:56:19+5:302016-05-08T01:05:26+5:30
औरंगाबाद : नुकत्याच पार पडलेल्या डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप (डीजीवायपीसी) चा किशोरवयीन मुलांवर चांगल्या प्रकारचा मनोवैज्ञानिक प्रभाव दिसून आला.

युथ पार्लमेंटचा मुलांवर मनोवैज्ञानिक प्रभाव
औरंगाबाद : नुकत्याच पार पडलेल्या डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप (डीजीवायपीसी) चा किशोरवयीन मुलांवर चांगल्या प्रकारचा मनोवैज्ञानिक प्रभाव दिसून आला. ही बाब डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधील मनोविज्ञान विभागातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक पद्धतीने करण्यात आलेल्या परीक्षणातून समोर आली आहे. यादरम्यान राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्येही महाराष्ट्र पोलिसांच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. एवढेच नव्हे तर असा उपक्रम अन्य राज्यांतील पोलीस विभागानेही राबवावा यावर भर देण्यात आला.
मागील वर्षी पोलीस आयुक्तालयात महाराष्ट्र पोलीस इंटर्नशिप प्रोग्राम (एमपीआयपी) अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या एका गटाच्या माध्यमाने ‘थिमेटिक एपसेंप्सन टेस्ट’ (टीएटी) तयार करण्यात आली. मनोविज्ञानाच्या विद्यार्थ्यांना वैजापूर येथील सहायक पोलीस अधीक्षक हर्ष पोदार यांना टेस्टसाठी नामांकित केले होते. तपासणीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी आणि कट्टरताबद्दल घृणा निर्माण झाल्याचे दिसून आले. यामुळे उत्साहित झालेल्या औरंगाबाद पोलिसांनी युथ पार्लमेंट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या पर्वामध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याची तयारी सुरूकेली आहे.