आंतरशालेय देशभक्तीपर गीत स्पर्धेत पीएसबीए शाळा अव्वल

By Admin | Updated: August 17, 2014 01:42 IST2014-08-17T01:11:05+5:302014-08-17T01:42:27+5:30

औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबतर्फे आयोजित आंतरशालेय देशभक्तीपर गीत स्पर्धेत पीएसबीए शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.

PSBA School topper in inter school patriotic song competition | आंतरशालेय देशभक्तीपर गीत स्पर्धेत पीएसबीए शाळा अव्वल

आंतरशालेय देशभक्तीपर गीत स्पर्धेत पीएसबीए शाळा अव्वल

औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबतर्फे आयोजित आंतरशालेय देशभक्तीपर गीत स्पर्धेत पीएसबीए शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय पुरस्काराचे मानकरी स्टेपिंग स्टोन स्कूल, तर तिसरे बक्षीस जालना येथील गोल्डन ज्युबली शाळेच्या संघाने पटकावले. स्पर्धेत तीन संघांना समान गुण मिळाल्याने त्यांना उत्तेजनार्थ ट्रॉफी देण्यात आली. यामध्ये नाथ व्हॅली स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल (आयसीएसई) आणि पोद्दार इंटरनॅशनल (सीबीएसई) या शाळांचा समावेश आहे.
लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षातील पहिली स्पर्धा देशभक्तीवर आधारित ठेवली होती. स्वातंत्र्य दिन दोन दिवसांवर आलेला असताना घेण्यात आलेल्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ३८ शाळांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. तापडिया नाट्य मंदिर येथे ही स्पर्धा पार पडली. सकाळी ११ वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. सकाळी ९.३० वाजता विविध संघ गिटार, ड्रम, तबला, हार्मोनियम आदी वाद्यांसह हजर झाले. यावेळी ख्यातनाम पार्श्वगायिका आरती पाटणकर, अनघा काळे, प्रा. डॉ. अनघा चौधरी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन आणि लोकमतचे संस्थापक संपादक दिवंगत ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्पर्धेची सुरुवात वंदे मातरम् या गीताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या फिल्मी आणि नॉन फिल्मी गीतांनी संपूर्ण नाट्यगृह देशभक्तीरसात न्हाऊन निघाले. ‘ताकत वतन की हमसे है...’, ‘छोडो कल की बातें...’, ‘हैै प्रीत जहाँ की रित सदा....’ , ‘हिंदुस्थान मेरी जान...’ या आणि अन्य विविध गीतांनी विद्यार्थी, पालक श्रोते मंत्रमुग्ध झाले. काही स्पर्धकांना पहिल्यांदाच व्यासपीठावर गायनाची संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी तौैसिफ खान यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. कमिटी सदस्य कु मकुम चौधरी, लक्ष्मी मूर्ती यांनी संपूर्ण स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला.

Web Title: PSBA School topper in inter school patriotic song competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.