कंधार तहसीलच्या नवीन इमारतीसाठी १ कोटी ९० लाखांची तरतूद

By Admin | Updated: July 31, 2014 00:48 IST2014-07-30T23:50:48+5:302014-07-31T00:48:02+5:30

कंधार : शहरातील तहसील कार्यालयाची नवीन इमारत बांधकाम १ कोटी ९० लाख ४२ हजारांतून उभारण्यात येणार आहे़

A provision of Rs.1.9 crore for the new building of Kandahar Tahsil | कंधार तहसीलच्या नवीन इमारतीसाठी १ कोटी ९० लाखांची तरतूद

कंधार तहसीलच्या नवीन इमारतीसाठी १ कोटी ९० लाखांची तरतूद

कंधार : शहरातील तहसील कार्यालयाची नवीन इमारत बांधकाम १ कोटी ९० लाख ४२ हजारांतून उभारण्यात येणार आहे़ अद्ययावत सोयी-सुविधांसह नवी वास्तु उभारण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात तहसील कार्यालयाचे स्थलांतर लोहा रस्त्यावरील ऩ प़ इमारतीत करण्यात आले आहे आहे़
शहरातील मुख्य रस्त्यालगत तहसील कार्यालयाची इमारत आहे़ जवळपास ४ दशकांपूर्वी इमारत बांधकाम करण्यात आले होते़ अपुरे कक्ष, स्वच्छतागृहाची अपुरी संख्या, महिला कर्मचाऱ्यांची स्वच्छतागृहाअभावी होणारी हेळसांड, अभ्यंगताची परवड आदींमुळे कर्मचारी-नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असे़ कार्यालयाच्या पश्चिमेस असलेल्या जागेची लघूशंकेमुळे मोठी दुरवस्था झालेली पाहताना मनाला वेदना होत असे़ मोठ्या गैरसोयीमुळे सर्वांनाच यातना सहन करावी लागत असे़ त्यामुळे नवीन इमारत बांधकाम सर्व सोयी सुविधायुक्त असावी असा सूर जनतेतून उमटू लागला़ त्यासाठी आॅक्टोबर २०११ मध्ये नवीन इमारत बांधकामासाठी २ कोटी ३१ लाख १५ हजार मंजूर झाले़
तहसील कार्यालयाची जुनी इमारत पाडून सव्वाएकर जागेवर टोलेजंग इमारत बांधण्यात येणार आहे़ तहसीलदाराचे कक्ष, तहसीलदार कोर्ट, प्रतीक्षालय, सप्लाय इन सेक्टर, नायब तहसीलदार कोर्ट, आॅफिस हॉल, संगणक कक्ष, दोन रेकॉर्ड रूम, स्ट्राँग रूम, बैठक-सभागृह, आॅफीस हॉल, दोन नायब तहसीलदार कक्ष आदींचे बांधकाम १०२० स्क्वेअर मीटरचे होणार आहे़ त्यासाठी १ कोटी ९०लाख ४२ हजारांचा खर्च रण्यात आला आहे़ त्यातून रंगरंगोटी, विद्युतीकरणाची कामेही समाविष्ट होणार आहेत़ बांधकाम हे आरसीसीमध्ये होणार असून येत्या काही दिवसांत काम सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे़ (वार्ताहर)
निधी मंजूर झाला तरीही इमारत उभारण्यावरून वादाला सुरुवात झाली़ शहराबाहेर कार्यालय हलविण्यास व नवी इमारत बांधकामास निवेदनाद्वारे विरोध करण्यात आला़ शहराबाहेरील जागेत इमारतीचा प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आणि जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला़ त्यामुळे तात्पुरते तहसील कार्यालय लोहा रस्त्यावरील डाव्या बाजूस असलेल्या ऩप़च्या नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे़ अपवाद वगळता सर्व कामे येथेच सुरू झाले आहेत़ ऩप़ची टोलेजंग इमारत नगराध्यक्षा शोभाताई नळगे, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, उपनगराध्यक्ष जफर बाहोद्दीन, सर्व ऩप़ सदस्य यांनी उपलब्ध करून दिली़

Web Title: A provision of Rs.1.9 crore for the new building of Kandahar Tahsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.