पुरवणी देयक ांसाठी ८४ लाखांची तरतूद
By Admin | Updated: July 27, 2016 00:51 IST2016-07-27T00:26:25+5:302016-07-27T00:51:14+5:30
औरंगाबाद : जि.प. शिक्षकांची थकीत पुरवणी देयके निकाली काढण्यासाठी वित्त विभागाने तब्बल ८४ लाख रुपयांचे वित्तप्रेषण पंचायत समित्यांना वितरित केले आहे.

पुरवणी देयक ांसाठी ८४ लाखांची तरतूद
औरंगाबाद : जि.प. शिक्षकांची थकीत पुरवणी देयके निकाली काढण्यासाठी वित्त विभागाने तब्बल ८४ लाख रुपयांचे वित्तप्रेषण पंचायत समित्यांना वितरित केले आहे. वित्त विभागाच्या या तत्परतेमुळे शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
शिक्षकांच्या रखडलेल्या विविध पुरवणी देयकामध्ये चटोपाध्याय वेतनश्रेणी प्राप्त शिक्षकांच्या फरकांची रक्कम, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके, अतिरिक्त शिक्षकांचे मासिक वेतन यांचा समावेश आहे. पुरवणी देयकाची ही रक्कम जवळपास ३ कोटी २१ लाख रुपये एवढी आहे. काल ८४ लाख एवढी रक्कम तालुक्यांना वितरित करण्यात आली. उर्वरित रक्कम दहा दिवसांत वितरित केली जाईल, असे वित्त विभागाचे म्हणणे आहे.
अलीकडच्या काही महिन्यांपासून शिक्षकांची कोट्यवधी रुपयांची पुरवणी देयके रखडली आहेत. यासंदर्भात विविध शिक्षक संघटनांनी प्रशासनाकडे पाठपुरावाही केला; पण पंचायत समितीस्तरावरून मागणी आल्याशिवाय त्यासंबंधीचे वित्तप्रेषण तयार करता येत नाही. अलीकडे काही पंचायत समित्यांनी पुरवणी देयकांसाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार ८४ लाख रुपयांचे वित्तप्रेषण सर्व पंचायत समित्यांना पाठविण्यात आल्याची माहिती जि.प.चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांनी दिली.
प्राथमिक शिक्षक संघाचे मधुकर वालतुरे, राजेश हिवाळे, जिल्हाध्यक्ष काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, जे.के. चव्हाण, हारूण शेख, प्रवीण पांडे, दिलीप साखळे आदींनी १३ जुलै रोजी जि.प. प्रशासनाकडे यासंदर्भात तगादा लावला होता. त्यानुसार काल अखेर पुरवणी देयके निकाली काढण्यासाठी वित्त विभागाने पावले उचलली. त्यामुळे जिल्हाभरातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.