मनपाच्या अतिक्रमण विभागाला पोलीस बंदोबस्त प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:05 IST2017-08-21T01:05:02+5:302017-08-21T01:05:02+5:30
अतिक्रमण हटाव पथकासाठी महापालिकेने पोलीस आयुक्तांकडून कायमस्वरूपी बंदोबस्त घेतला होता शनिवारी पुन्हा पोलीस बंदोबस्त प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

मनपाच्या अतिक्रमण विभागाला पोलीस बंदोबस्त प्रदान
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अतिक्रमण हटाव पथकासाठी महापालिकेने पोलीस आयुक्तांकडून कायमस्वरूपी बंदोबस्त घेतला होता. या पोलीस कर्मचाºयांच्या पगाराची रक्कम दर महिन्याला पोलीस आयुक्तालयात जमा करावी लागते. मागील काही वर्षांपासून मनपाने पैसेच भरले नाहीत. त्यामुळे मागील महिन्यात आयुक्तालयाने पोलीस बंदोबस्त काढून घेतला होता. शनिवारी पुन्हा पोलीस बंदोबस्त प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी पूर्वी मनपाला सतत पोलीस बंदोबस्त मागवून घ्यावा लागत होता. पोलीस आयुक्तालयाने मनपाला १ पोलीस निरीक्षक आणि २० कर्मचारी कायमस्वरूपी दिले. बंदोबस्तासाठी देण्यात आलेले कर्मचारी तीन ते चार वर्षांपासून महापालिकेत काम करीत होते.
मनपा प्रशासनाने पोलीस आयुक्तालयात साडेसहा कोटी रुपयांची थकबाकी न भरल्याने सर्व पोलीस कर्मचारी मागील महिन्यात मनपातून काढून घेतले होते.
अतिक्रमण हटावसाठी घेण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तापोटी दरवर्षी महापालिकेला १ कोटी ८ लाख रुपयांचा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून महापालिकेने ही रक्कम पोलीस आयुक्तालयाकडे जमाच केली नाही. आयुक्तालयाने पैसे भरावेत, अशी मागणी मनपाकडे वारंवार केली. ६ कोटी ५० लाख रुपये भरण्यास महापालिकेकडून विलंब झाला. शेवटी मागील महिन्यात पोलीस बंदोबस्त काढून घेण्यात आला होता. शनिवारी परत मनपाला पोलीस बंदोबस्त प्रदान करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.