पेरणीसाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्या : कल्याण गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:06 IST2021-06-09T04:06:57+5:302021-06-09T04:06:57+5:30

पैठण : लॉकडाऊन व नैसर्गिक आपत्तीने खचलेल्या शेतकऱ्यांना खरिपाची पेरणी करण्यासाठी राज्यसरकारने सरसकट पाच हजार रुपये मदत देऊन विनाअट ...

Provide crop loans to farmers for sowing: Kalyan Gaikwad | पेरणीसाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्या : कल्याण गायकवाड

पेरणीसाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्या : कल्याण गायकवाड

पैठण : लॉकडाऊन व नैसर्गिक आपत्तीने खचलेल्या शेतकऱ्यांना खरिपाची पेरणी करण्यासाठी राज्यसरकारने सरसकट पाच हजार रुपये मदत देऊन विनाअट पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश बँकांना द्यावेत, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कल्याण नाना गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास किसान मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

निवेदनात असे म्हटले आहे की, लॉकडाऊन व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा भरपाई देताना हात आखडता घेऊन बोळवण केली आहे. अतिवृष्टी व दुष्काळ साहाय्याचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाही. खरिपाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे असून पीक कर्ज वाटपास जिल्ह्यातील बँका टाळाटाळ करत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. पीक विमा भरलेल्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रूपये मदत द्यावी, मध्यवर्ती बँकेतून पीक कर्जाचे वाटप करावे, अतिवृष्टी व दुष्काळ मदतीचा दुसरा हप्ता तातडीने देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

----

फोटो नाही.

Web Title: Provide crop loans to farmers for sowing: Kalyan Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.