आयुक्तांकडून समृद्धीच्या बछड्यांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:09 IST2021-01-13T04:09:36+5:302021-01-13T04:09:36+5:30
केंद्र सरकारने शहरातील सिद्धार्थ उद्यान व प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्याचे निर्देशदेखील औरंगाबाद पालिकेला दिले आहेत. त्यानुसार पालिकेने केंद्राकडून आदेश येईपर्यंत ...

आयुक्तांकडून समृद्धीच्या बछड्यांची पाहणी
केंद्र सरकारने शहरातील सिद्धार्थ उद्यान व प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्याचे निर्देशदेखील औरंगाबाद पालिकेला दिले आहेत. त्यानुसार पालिकेने केंद्राकडून आदेश येईपर्यंत प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पांडेय यांनी सिद्धार्थ उद्यान व प्राणीसंंग्रहालयाला भेट देत तेथील प्राणी व पक्षांच्या सोयी-सुविधांची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी समृद्धी वाघिणीने दिलेल्या बछड्यांचीही पाहणी करत अधिकार्यांना काही सूचना केल्या. बछड्यांचे केअर टेकर यांनी जातीने या ठिकाणी हजर राहून सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या मदतीने वाघीण व तिच्या पिल्लांवर नजर ठेवावी. थंडीचे दिवस असल्याने पिंजर्यात उबदारपणा राहण्यासाठी रूम हिटरची व्यवस्था करावी. भंडारा येथे झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी केअर टेकर यांनी ३ शिफ्टमध्ये हजर राहून बछड्यांची दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या. यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे, उद्यान अधीक्षक विजय पाटील यांची उपस्थिती होती.