शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले
2
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
3
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेणार...
4
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
5
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
6
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
8
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
9
Who is Vidwath Kaverappa? १७व्या वर्षापर्यंत हॉकी खेळला अन् मग क्रिकेटकडे वळला... त्याने फॅफ, विल जॅक्सला पाठवले मागे
10
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
11
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
12
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
13
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
14
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
17
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
18
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
19
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
20
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?

भावी डॉक्टर तरुणीच्या शिष्यवृत्तीचे ८० हजार पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 9:47 PM

भावी डॉक्टर तरुणीच्या एटीएम कार्डचे क्लोन करून सायबर गुन्हेगारांनी ओरिसातील कटक येथील एटीएममधून तब्बल ८० हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला.

औरंगाबाद : भावी डॉक्टर तरुणीच्या एटीएम कार्डचे क्लोन करून सायबर गुन्हेगारांनी ओरिसातील कटक येथील एटीएममधून तब्बल ८० हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. २५ जानेवारी रोजी झालेल्या या फसवणुकीची माहिती ५ फेब्रुवारी रोजी मिळाल्यानंतर तरुणीने याविषयी एसबीआय आणि सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. बँकेकडून सहकार्य न मिळाल्याने शेवटी तरुणीने वकिलांमार्फत बँकेला नोटीस बजावली आहे. दुसरीकडे ही बँकेची चूक असल्याचे स्पष्ट करून सायबर ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिला.

उल्कानगरी येथील सहयोगनगरात राहणाऱ्या क ोमल चंदनसिंग परदेशी ही विद्यार्थिनी धुळे येथे वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेत आहे. शासनाकडून शिष्यवृत्ती मिळते म्हणून कोमलने उल्कानगरी शास्त्रीनगर येथील भारतीय स्टेट बँकेत बचत खाते उघडले. या बचत खात्यात शासनाने मागील आणि चालू वर्षाची शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली होती. पुढील शिक्षणासाठी हे पैसे लागणार असल्याने कोमलने त्या खात्यातून एक रुपयाही काढला नव्हता.

तिच्या खात्यात सुमारे १ लाख ४० हजार रुपये शिल्लक असताना २५ जानेवारी रोजी मध्यरात्री सायबर गुन्हेगारांनी चार वेळा २० हजार रुपये याप्रमाणे एकूण ८० हजार रुपये एटीएमद्वारे ओरिसामधील कटक येथे काढले. पैसे काढल्याचे मेसेज बँकेकडून कोमलला पाठविण्यात आले. मात्र तिने हे मेसेज वाचलेच नव्हते. कटक येथून झालेल्या व्यवहाराबाबत संशय आल्याने बँकेने कोमलचे एटीएम कार्ड ब्लॉक केले. त्याबाबतचा मेसेजही कोमलला पाठविला. दरम्यान ५ फेब्रुवारी रोजी कोमलने सहज मेसेज बॉक्समधील मेसेज वाचले असता आपल्या खात्यातून ८० हजार रुपये कोणीतरी काढल्याचे समजले. त्यानंतर तिने बॅँक मॅनेजर आणि बँकेच्या टोल फ्री नंबरवर याविषयी तक्रार केली. तेव्हा तुमच्या खात्यातून दोन वेळा पैसे काढण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात चार वेळा प्रत्येकी २० हजार रुपये काढण्यात आल्याचे पासबुक एंट्री आणि खात्यातील शिल्लक रकमेवरून दिसते. असे असताना तक्रार बंद करण्यात आल्याचे बँकेने त्यांना कळविले.पोलीस आणि बँकेकडून टोलवाटोलवीबँक व्यवस्थापकांनी याविषयी पोलिसांत तक्रार नोंदवून एफआयआरची प्रत दिल्यास पुढील कार्यवाही करतो, असे कोमल यांना सांगितले. तर ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी बँकेची असल्याने गुन्हा नोंदविता येणार नाही, असे स्पष्टीकरण देत सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिल्याचे कोमलने सदर प्रतिनिधीला सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद