शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
3
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
4
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
5
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
6
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
7
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
9
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
10
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
11
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
12
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
13
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
14
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
15
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
16
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
17
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
18
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
19
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
20
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!

जिल्ह्यात सर्वेक्षणानंतर ६४ बोअर प्रस्तावित

By admin | Published: February 18, 2016 11:27 PM

हिंगोली : सर्वेक्षणानंतर ६४ बोअर तर १३ तात्पुरत्या पूरक योजनांची कामे करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

हिंगोली : जिल्ह्यात पाणीटंचाईवरील उपाययोजना करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व जि.प.च्या भूवैज्ञानिकांकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर ६४ बोअर तर १३ तात्पुरत्या पूरक योजनांची कामे करण्याची शिफारस करण्यात आली आहे.हिंगोली जिल्ह्यात टंचाई निवारणाचे काम गतिहीन असल्याच्या तक्रारी होत आहेत. वारंवार मागणी करूनही उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षणच्या पाहणीनंतर खरोखर उपायांची गरज असलेल्या ठिकाणांना आता न्याय मिळेल काय, याची प्रतीक्षा आहे. यामध्ये ३00 गावांनी टंचाईत ३४१ बोअरचे प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी ६४ करण्यायोग्य आहेत. यात हिंगोली-१२, औंढा-१४, सेनगाव-१९, वसमत-११, कळमनुरी-८ अशी तालुकानिहाय संख्या आहे. तर १४२ अयोग्य असल्याचे मत नोंदविले आहे. त्याचबरोबर टंचाईत ७८ नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचे प्रस्ताव आले होते. त्यापैकी ७३ चे सर्वेक्षण झाले. यात १९ प्रस्ताव योग्य आढळले. यात हिंगोली-३, औंढा-८, सेनगाव-९, वसमत-२, कळमनुरी-८ अशी तालुकानिहाय संख्या आहे. एकूण ४१ योग्य तर ३१ अयोग्य आढळले. तात्पुरत्या पूरक दुरुस्तीचे ४४ योजनांचे प्रस्ताव आले होते. त्यापैकी २९ चे सर्वेक्षण झाले. यात हिंगोली-१0, सेनगाव-४ तर कळमनुरीतील दोन प्रस्ताव योग्य असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर औंढ्यात व वसमतमध्ये प्रत्येकी तीन ठिकाणचे टँकरचे प्रस्ताव योग्य असल्याचे आढळून आले आहे. १५ फेब्रुवारीअखेरचा हा अहवाल असून तो जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे. एवढे प्रस्ताव कामे करण्यायोग्य असल्याचा प्रशासनाचाच निर्वाळा असताना मंजुरी मात्र मिळत नसल्याची बोंब आहे.