मुखेड तालुक्याचा ११ कोटींचा पाणीटंचाई आराखडा प्रस्तावित

By Admin | Updated: December 17, 2015 00:21 IST2015-12-16T23:38:35+5:302015-12-17T00:21:26+5:30

मुखेड : तालुक्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आॅक्टोबर ते डिसेंबर महिन्यासाठी २ कोटी १५ लाख ५६ हजारांचा निधी मंजूर

Proposed 11 million water shortage plan in Mukhed Taluka | मुखेड तालुक्याचा ११ कोटींचा पाणीटंचाई आराखडा प्रस्तावित

मुखेड तालुक्याचा ११ कोटींचा पाणीटंचाई आराखडा प्रस्तावित

मुखेड : तालुक्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आॅक्टोबर ते डिसेंबर महिन्यासाठी २ कोटी १५ लाख ५६ हजारांचा निधी मंजूर असून जानेवारी २०१६ ते मार्च २०१६ साठी ६ कोटी ६६ लाख ६ हजार व एप्रिल ते जून २०१६ साठी ४ कोटी ४८ लाख ८ हजार असा एकूण ११ कोटी १४ लाख रुपयांचा टंचाई आराखडा मंजुरीसाठी नांदेड जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला आहे़
१४७ गावांत नवीन विंधन विहीर घेण्यासाठी ७३ लाख ५० हजार, १४ गावांत नळयोजना विशेष दुरुस्तीसाठी ७३ लाख ५० हजार, १७ गावच्या पुरक योेजनेसाठी ६७ लाख ५० हजार, दोन गावच्या विंधन विहीर विशेष दुरुस्तीसाठी २० हजार, ३५१ विहीर अधिग्रहणासाठी १ कोटी २६ लाख ३६ हजार, ९९ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी २ कोटी ९७ लाख, २८ ठिकाणच्या विहीर खोल करणे व गाळ करणे २८ लाख अशा ६६२ कामांसाठी ६ कोटी ६६ लाखांचा प्रस्तावित आराखडा तयार करण्यात आला आहे़ तर एप्रिल ते जून २०१६ साठी ४ कोटी ४८ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला असून विहीर अधिग्रहण व टँकरने पाणीपुरवठा यावरच भर देण्यात आला आहे़ यात ३५३ विहीर अधिग्रहण करण्यासाठी १ कोटी २७ लाख ८ हजार व १०७ गावांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ३ कोटी २१ लाख रुपये खर्च अपेक्षित करण्यात आला असून ४६० कामांसाठी ४ कोटी ४८ लाखांचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला़ मंंजुरीसाठी जि़ प़ मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आल्याचे गटविकास अधिकारी व्ही़ एऩ घोडके यांनी सांगितले़ (वार्ताहर)

Web Title: Proposed 11 million water shortage plan in Mukhed Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.