५०० गावांत शुद्ध पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव
By Admin | Updated: August 8, 2014 00:38 IST2014-08-08T00:37:48+5:302014-08-08T00:38:15+5:30
नांदेड : जिल्ह्यातील ४९५ गावांनी केंद्र शासनाच्या मागासक्षेत्र अनुदान निधीतून गावासाठी शुध्द पाणीपुरवठा यंत्र बसविण्याचे प्रस्ताव ग्रामीण विकास यंत्रणेकडे सादर केले आहेत़

५०० गावांत शुद्ध पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव
नांदेड : जिल्ह्यातील ४९५ गावांनी केंद्र शासनाच्या मागासक्षेत्र अनुदान निधीतून गावासाठी शुध्द पाणीपुरवठा यंत्र बसविण्याचे प्रस्ताव ग्रामीण विकास यंत्रणेकडे सादर केले आहेत़ हे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करून सदर आराखड्यास राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे़
जिल्ह्यातील अनेक गावांत दुषीत पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत़ त्याचवेळी किनवट व माहूर तालुक्यासह अन्य भागातही काही गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याचा प्रश्न गंभीर आहे़ येथील नागरिक विविध आजारांशी लढा देत आहेत़
ही बाब लक्षात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी गावांमध्ये पाणीपुरवठा यंत्र बसविण्याबाबत चाचपणी केली़ त्यानुसार केंद्र शासनाच्या मागास क्षेत्र अनुदान निधीतून हा आरोग्यदायी प्रकल्प राबविण्यात येणार आहे़ जिल्ह्यातील जवळपास ५०० गावांनी शुध्द पाणीपुरवठा यंत्राबाबतचे प्रस्ताव सादर केले आहेत़ या सर्व गावातील यंत्रांसाठी जवळपास १६ कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे़ प्रत्येक गावातील लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा यंत्र बसविले जाणार आहेत़ एका यंत्रासाठी ३ लाखांपर्यंतचा खर्च अपेक्षीत आहे़
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने या यंत्रांसाठी अपेक्षीत किंमतीच्या निविदा मागविल्या आहेत़ राज्यभरातील विविध कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या असून त्याची छाननी केली जात आहे़
मागास क्षेत्र अनुदान निधी प्राप्त होताच प्रस्ताव आलेल्या गावात पाणी शुध्दीकरण यंत्र बसविण्यात येथील अशी माहिती प्रभारी प्रकल्प संचालक गुलाबसिंह राठोड यांनी दिली़
(प्रतिनिधी)