२८ गावांत टंचाईच्या कामांसाठी प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:04 IST2021-05-07T04:04:11+5:302021-05-07T04:04:11+5:30
--- औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात २५० गावांत पाणीटंचाई जाणवते. मात्र, यावर्षी पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठे भरलेले आहेत. त्यामुळे ...

२८ गावांत टंचाईच्या कामांसाठी प्रस्ताव
---
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात २५० गावांत पाणीटंचाई जाणवते. मात्र, यावर्षी पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठे भरलेले आहेत. त्यामुळे केवळ २० तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना आणि ८ विशेष पाणीपुरवठा दुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता अशोक घुगे यांनी दिली.
विभागाला तात्पुरते कनिष्ठ भूवैज्ञानिक १५ दिवसांसाठी मिळाले. त्यांनी रखडेलेले १५ प्रस्ताव मार्गी लावले. तर रजेवरील कनिष्ठ भूवैज्ञानिक सय्यद रुजू झाल्याने कामकाज नियमित सुरू झाले आहे. आणखी एक नवीन पद भरण्याची प्रक्रिया सुरू असून तोपर्यंत वरिष्ठ भूवैज्ञानिकांना रखडलेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या स्त्रोताच्या कामांना प्रमाणपत्र देण्याचे काम मार्गी लावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे घुगे म्हणाले.
जलजीवन मिशनसाठी २०२३-२४ पर्यंत प्रत्येक घराला नळ कनेक्शन देण्यासाठी डीपीआर सादर करण्यात आला होता. त्याच्या त्रुटी पूर्ततेचे काम सध्या सुरु असून ७०६ कोटींचा हा प्रस्ताव आहे. शासनाची राज्यस्तरीय निवड समिती कामे अंतिम करून मंजुरीनंतर ती कामे सुरू होतील. या योजना ग्रामपातळीवर मंजूर होतात. त्यासाठी प्रत्यक्ष कृती आराखड्याचेही काम सुरू असल्याचे घुगे यांनी सांगितले.