आजच्या सभेत ९८ कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:05 IST2018-01-08T00:05:44+5:302018-01-08T00:05:50+5:30
महापालिकेची नियमित सर्वसाधारण सभा सोमवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेस मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर उपस्थित राहणार नाहीत.

आजच्या सभेत ९८ कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेची नियमित सर्वसाधारण सभा सोमवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेस मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर उपस्थित राहणार नाहीत. मुंबईला एका महत्त्वाच्या बैठकीसाठी ते जाणार आहेत. सभेत भूमिगत गटार योजनेसाठी ९८ कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा महत्त्वपूर्ण ठराव आहे. सभा काही वेळ चालवून तहकूब करण्याचा विचार सत्ताधारी करीत आहेत.
महापौरांवर खुर्ची भिरकावल्याच्या आरोपावरून एमआयएमचे नगरसेवक शेख जफर, सय्यद मतीन हर्सूल कारागृहात आहेत. अतिक्रमण हटाव मोहिमेत हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा ठराव शनिवारी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. दोन घटनांमुळे महापालिकेत एमआयएम पक्ष बॅकफुटवर आला आहे. त्यातच सोमवारी नियमित सर्वसाधारण सभा घेण्यात येत आहे. या सभेत एमआयएम पक्षाचे नगरसेवक कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भूमिगत गटार योजनेसाठी ९८ कोटी रुपये कर्ज घेण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सभेसमोर आहे. महापालिकेची मालमत्ता गहाण न ठेवता कर्ज घेण्याची युक्ती पदाधिकाºयांनी शोधून काढली आहे. हर्सूल गाळ प्रकरणात कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता के. एम. फालक, किरण धांडे यांच्या विभागीय चौकशीचाही प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे.