एनडीआरएफकडून ट्रेनिंग संदर्भात प्रस्ताव
By Admin | Updated: May 12, 2017 23:33 IST2017-05-12T23:30:22+5:302017-05-12T23:33:28+5:30
बीड : पावसाळा सुरू होण्यासाठी सरासरी महिनाभराचा अवधी शिल्लक आहे.

एनडीआरएफकडून ट्रेनिंग संदर्भात प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पावसाळा सुरू होण्यासाठी सरासरी महिनाभराचा अवधी शिल्लक आहे. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये, तसेच संस्थांना पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी एनडीआरएफअंतर्गत ट्रेनिंग द्यावे, याबाबत बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव पाठविला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गतवर्षी पावसाळ्यात शेवटच्या टप्प्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. नियोजनाअभावी पूरबळीदेखील गेले. या परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंग यांनी आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीआरएफकडून दिलेल्या प्रस्तावाबाबत उत्तर आलेले नाही. मात्र, लवकरच जिल्ह्यात ठिकठिकाणी पूर परिस्थितीवर मात करण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिका प्रशासनाला मुख्य गटारी तसेच पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याची काळजी घेण्यासंदर्भात देखील आपत्ती व्यवस्थापनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.