शहरातील सुमारे ४० गुंडांच्या हद्दपारीचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:05 IST2021-06-24T04:05:06+5:302021-06-24T04:05:06+5:30

औरंगाबाद : कोरोना साथरोगामुळे गुन्ह्यांचे प्रमाण घटल्याने हद्दपारीच्या कारवाईलाही ब्रेक लागला होता. आता अनब्रेक होताच पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील ...

Proposal to deport about 40 goons in the city | शहरातील सुमारे ४० गुंडांच्या हद्दपारीचे प्रस्ताव

शहरातील सुमारे ४० गुंडांच्या हद्दपारीचे प्रस्ताव

औरंगाबाद : कोरोना साथरोगामुळे गुन्ह्यांचे प्रमाण घटल्याने हद्दपारीच्या कारवाईलाही ब्रेक लागला होता. आता अनब्रेक होताच पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील सुमारे ४० गुन्हेगारांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार केल्याचे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद शहरात पोलीस रेकाॅर्डवर लहान-मोठे १ हजार २९५ गुन्हेगार आहेत. यापैकी ३ पेक्षा अधिक गुन्हे असलेल्या आरोपींची संख्या २०० आहे. तर काही आरोपींवर एक अथवा दोन गुन्हे आहेत. यातील अनेक गुन्हे किरकोळ स्वरूपाचे आहेत. गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे काही गुन्हेगार जेलमध्ये आहेत. तर काही जामिनावर बाहेर आहेत. जामीन घेऊन जेलबाहेर आल्यानंतर पुन्हा गुन्हा केल्यास त्यांची जमानत रद्द होऊ शकते. मात्र, पोलिसांच्या कारवाईचा गुन्हेगारांवर परिणाम होत नाही. ते सतत गुन्हे करीत असतात. यासोबतच प्रत्येक वसाहतीत नवीन नवीन गुन्हेगार तयार होतात. सक्रिय गुन्हेगाराला शहरातून हद्दपार करणे, कारागृहात स्थानबद्ध करणे आदी गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाते. तत्कालीन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या कार्यकाळात शहरातील १००हून अधिक गुंडांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र यापैकी ५० टक्के गुन्हेगारांची कारवाई रद्द झाली होती. गतवर्षी कोरोना संसर्गाची साथ सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन लागले. यामुळे सर्वसामान्य जनता घरात होती. तर लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस रस्त्यावर होते. २०२० मध्ये शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ २ मध्ये एकाही गुन्हेगारावर हद्दपारीची कारवाई झाली नाही. परिमंडळ १ मध्ये मात्र १६ गुंडांना शहरातून हद्दपार करण्यात आले होते.

या वर्षी आलेली कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यावर पोलिसांनी आता गुन्हेगारांवरील कारवाईवर लक्ष केंद्रित केले. पाेलीस उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी सात गुन्हेगारांवर कारवाई केली. संपूर्ण आयुक्तालयाच्या हद्दीतील सुमारे ४० गुन्हेगारांना तडीपार करण्याचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास प्राप्त झाले आहेत.

--------------------------

मनपा निवडणुकींच्या तोंडावर हद्दपारींचा बार

महापालिका निवडणूक शांततेत व्हावी, याकरिता शहरातील गुंड प्रवृत्तीच्या ४० जणांवर हद्दपारीची कारवाई करण्याचे नियोजन सुरू असल्याचे सूत्राने सांगितले. अपप्रवृत्तींच्या लोकांची यादी पोलीस प्रशासनाकडे तयार आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Proposal to deport about 40 goons in the city