जात पडताळणीचे प्रस्ताव जिल्हा समित्यांकडे वर्ग
By Admin | Updated: January 13, 2017 00:36 IST2017-01-13T00:35:44+5:302017-01-13T00:36:22+5:30
लातूर : जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आलेले सर्व प्रस्ताव विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जिल्हा समित्यांकडे वर्ग केले आहेत.

जात पडताळणीचे प्रस्ताव जिल्हा समित्यांकडे वर्ग
लातूर : जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आलेले सर्व प्रस्ताव विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जिल्हा समित्यांकडे वर्ग केले आहेत. लातूर विभागीय जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती अंतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेश होता. चार जिल्ह्यांच्या स्वतंत्र समित्या झाल्या असून, त्यांच्याकडे विभागीय समितीने ७ हजार ६९१ प्रस्ताव वर्ग केले आहेत़
२१ नाव्हेंबरपासून जिल्ह्यांसाठी स्वतंत्र जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लातूर विभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी लातूरच्या विभागीय कार्यालयाकडे दाखल करावे लागत होते. मात्र, आता स्वतंत्र जात प्रमाणपत्र पडताळणी सामित्यांची स्थापना केल्यामुळे त्या-त्या जिल्ह्यातील नागरिकांच्या दृष्टीने या समित्या सोयीच्या होणार आहेत.
नांदेड जिल्हा समितीकडे ४ हजार १०२ प्रस्ताव वर्ग केले आहेत. यात विद्यार्थी १६२४, सेवा प्रकरण २०२, निवडणूक १८०, इतर १, दक्षता पथकाकडील विद्यार्थी संचिका ११६, दक्षता पथकाकडील सेवा संचिका ३६६, दक्षता पथकातील निवडणूक संचिका १०३, सुनावणीतील विद्यार्थी संचिका ४५७, सुनावणीतील सेवा संचिका २३५, सुनावतील निवडणूक संचिका १६३, हायकोर्ट रिमांडेड संचिका १०, तक्रार संचिका २३, अपिल संचिका १८, वैधता प्रमाणपत्र ५५९ आणि नोंदणी रजिस्टर ४५ असे एकूण ४ हजार १०२ प्रस्ताव दाखल करण्यात आले होते.
हिंगोली जिल्हा समितीकडे १ हजार २६९ प्रस्ताव वर्ग केले आहेत. यात विद्यार्थी ३७१, सेवा प्रकरण ४२, निवडणूक १७६, दक्षता पथकाकडील विद्यार्थी संचिका ४१, दक्षता पथकाकडील सेवा संचिका ४२, दक्षता पथकाकडील निवडणूक संचिका ५२, सुनावणीतील विद्यार्थी संचिका ११७, सुनावणीतील सेवा संचिका ४५, सुनावणीतील निवडणूक संचिका ९५ आणि इतर २८८ आदीं प्रस्तावांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)