अधिग्रहणाच्या प्रस्तावांचा ओघ
By Admin | Updated: December 22, 2014 01:02 IST2014-12-22T00:56:20+5:302014-12-22T01:02:10+5:30
सितम सोनवणे , लातूर पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुका स्तरावार टंचाई कक्ष स्थापन करण्यात आले आहेत़ दहाही तालुक्यांच्या टंचाई निवारण कक्षात अधिग्रहणाचा ओघ वाढला आहे़

अधिग्रहणाच्या प्रस्तावांचा ओघ
सितम सोनवणे , लातूर
पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुका स्तरावार टंचाई कक्ष स्थापन करण्यात आले आहेत़ दहाही तालुक्यांच्या टंचाई निवारण कक्षात अधिग्रहणाचा ओघ वाढला आहे़ ९१ गावे व २४ वाड्यांतून अधिग्रहणाची मागणी करण्यात आली आहे़ टंचाई कक्षात १९० प्रस्ताव सध्या दाखल आहेत़
जिल्हा परिषदेच्या वतीने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेत टंचाई कक्षाची स्थापना करण्यात आली आहे़ जिल्हा परिषदेने १ डिसेंबरपासून तालुकानिहाय पंचायत समिती अंतर्गत टंचाई कक्षाची स्थापना करण्यात आली आहे़ मागणीनुसार पाणीपुरवठा करण्याच्या सूचना संबंधित पंचायत समितीला जिल्हा परिषदेच्या वतीने समन्वय बैठकीत करण्यात आल्या आहेत़ या टंचाई कक्षाचा प्रमुख म्हणून गटविकास अधिकारी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे़ पाणीटंचाईच्या आलेल्या प्रस्तावाची माहिती तहसीलदार यांना तात्काळ देवून त्याची गरज लक्षात घेवून त्यावर दोन दिवसात कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत़ या आदेशानुसार लातूर तालुक्यातील टंचाई कक्षाकडे २३ गावे, ४ वाड्यातून विहिरी, बोअरच्या अधिग्रहाणाची मागणी आली आहे़ पण प्रत्यक्षात १४ गावातून १८ प्रस्तांवाची मागणी आली आहे़ यातील १२ गावातील १६ प्रस्ताव मंजुर करण्यात आले आहेत़ औसा तालुक्यातील १९ गावातून ४० विहीर, बोअरचे अधिग्रहणाचे मागणी प्रस्ताव आले आहे़
यातील ५ गावचे ७ विहीर, बोअर अधिग्रहणाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे़ निलंगा तालुक्यातील १५ गावांमधून, १ वाडीमधून ४२ विहीर, बोअर अधिग्रहणाचे मागणी करण्यात आली आहे.४
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील ६ गावांमधून ९ विहीर, बोअरच्या अधिग्रहणाची मागणी करण्यात आली आहे़ यातील ४ गावातील ६ अधिग्रहण प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे़ देवणी तालुक्यातील १ गावांमधून ३ विहीर, बोअरची मागणी करण्यात आली आहे, पण प्रस्ताव एकही आला नाही़ जळकोट तालुक्यातील ३ गावामधून ३ विहिर, बोअर अधिग्रहणाची मागणी करण्यात आली आहे़ यातील १ गावातील १ विहिर अधिग्रहणाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे़ अशा प्रकारे जिल्ह्यातील २० गावे व १ वाडीतील २९ विहिर, बोअर अधिग्रहणाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे़४
निलंगा तालुक्यात २ गावातील ५ विहिर, बोअर अधिग्रहणाच्या मागणी प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे़ रेणापूर तालुक्यतील १० गावामधून, १० वाड्यांमधून ३३ विहिर, बोअर अधिग्रहणाची मागणी करण्यात आली आहे़ ८ गावे, २ वाड्यामधील १८ विहिर, बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत़ अहमदपूर तालुक्यातील १४ गाव, ९ वाड्यांमधून २५ विहिर, बोअर अधिग्रहणाचे मागणी क रण्यात आली आहे़ यातील ७ गावे, ७ वाड्यांच्या १४ अधिग्रहणाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे़ ४
चाकूर तालुका आणि उदगीर तालुक्यातील विहिर, बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव आले नाहीत़ टंचाई कक्षाकडे आलेल्या प्रस्तावांची पडताळणी करुन त्यांना तत्काळ पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता व्ही़ बी़ चव्हाण यांनी दिली आहे़ प्रस्ताव आला की त्याची पडताळणी तात्काळ होते, असेही ते म्हणाले.