मालमत्ता कराची वसुली ४६ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:15 IST2021-02-05T04:15:42+5:302021-02-05T04:15:42+5:30
१५ हजार नागरिकांकडून ७६ लाख दंड वसूल औरंगाबाद : महापालिकेच्या नागरिक मित्र पथकाकडून शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ...

मालमत्ता कराची वसुली ४६ लाख
१५ हजार नागरिकांकडून ७६ लाख दंड वसूल
औरंगाबाद : महापालिकेच्या नागरिक मित्र पथकाकडून शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशानुसार या पथकांनी १ एप्रिल २०२० ते २८ जानेवारी २०२१ या कालावधीत विना मास्क वावरणाऱ्या १५ हजार ३८९ नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रूपयेप्रमाणे ७६ लाख ९४ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.
मनपाकडून पाच हजार घरांचे सर्वेक्षण
औरंगाबाद : डेंग्यू प्रतिबंधासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवारी शहरातील सर्व नऊ प्रभागात मलेरिया विभागाच्या पथकांनी सर्वेक्षणाची मोहीम राबवली. यात एकूण ४ हजार ९४५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. १६५ डेंग्यूच्या डास उत्पत्तीची स्थाने आढळल्याने तेथे औषध फवारणी करून ती नष्ट करण्यात आली.